कविता

कसं विसरणार?

Submitted by मी विडंबनकार on 24 March, 2011 - 03:22

आईच्या हातची न्याहरी,
आईच्या हातचं जेवण.
एवढं प्रेम पुढे कोण देणार?
आईच्या मऊ कुशिलाच काय,
आईने पाठीवर दिलेल्या धपाट्यालासुद्धा , कसं विसरणार?

माझ्यावर कुणी बोट उचललं,
तिला सहन होत नसे,
तिच्या दिलखुलास हास्यालाच काय,
तिच्या डोळ्यातील पाण्यालासुद्धा , कसं विसरणार?

तू बोलायला शिकवलेला एक एक शब्द
तू खाऊ घातलेला एक एक मायेचा घास
तू चालायला शिकवलेलं एक एक पाउलच काय
तर चालताना अडखळून पडताना सावरलेलंसुद्धा , कसं विसरणार ?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

स्नुषास्तोत्र

Submitted by harish_dangat on 24 March, 2011 - 02:19

(ज्या बायकांचा मुलगा लग्नाच्या वयाचा झाला आहे त्यांनी हे स्तोत्राचे पठण करावे)

हे प्रभूजी दयाधना
येउदे तुझीया मना
सून बरी मिळूदे
हीच एक प्रार्थना

पुत्रास असावी जोड
सून अशी असावी गोड
परी नसूदे तिला जराही
तिच्या माहेराची ओढ

नवर्‍यास नसावा धाक
उभी असावी मारता हाक
अशी एक सून देवा
माझ्या पदरात टाक

सून असो दिसाया छान
कर्तुत्व आणि गुणवाण
एवढे सारे असूनही
माझा राखावा मान

नोकरी असावी न्यारी
पगार असावा भारी
महीन्याच्या शेवटाला
रक्कम हाती द्यावी सारी

शेजार्‍यांकडे नको जाणे
बाहेरचे न चरबट खाणे
भिशीची मिटींग असता
गावे एक मंजुळ गाणे

वागण्यात हवा धरबंध

गुलमोहर: 

व्यापार

Submitted by क्रांति on 23 March, 2011 - 14:04

केला सुखाचा व्यापार
दु:ख झाले, तोटा झाला
झोळीभर पश्चाताप,
खरा दाम खोटा झाला !

देवा, जगणं रुचंना
काय करावं सुचंना
भल्या सुपीक डोक्याचा
नर्मदेचा गोटा झाला !

तोंडावर लाडीगोडी
पाठ फिरताच खोडी
असे ग्राहक भेटले,
ठकसेन छोटा झाला !

जमा अक्कलखात्यात,
तुझी सावकारी त्यात
हात बुद्धीचे गहाण,
उभा जन्म थोटा झाला !

कधी केली ना लाचारी,
आज देणेकरी दारी
ऐकती ना विनवण्या
गोंधळ वांझोटा झाला !

खुळ्या मनाचं ऐकून
दिलं आयुष्य झोकून
झाले भणंग, भिकारी
मुद्दलात तोटा झाला !

गुलमोहर: 

बोल मनाचे १

Submitted by धनेष नंबियार on 23 March, 2011 - 11:30

बोल मनाचे - १
=========

आपल्या दाताखाली
आपलेच ओठ,
अन् आपल्या चुकांवर मात्र
भलत्याचेच बोट...

------------------------------------------०

विचाराने मेलेल्या मनाला
कशाचीच भीती नसते,
आज नाहितर उद्या त्याला
चिते मध्येच जळायचे असते.

------------------------------------------०

तुला अलविदा केले तेव्हा
मन अगदि हताश होऊन बसले होते,
पापण्यां मागे अश्रुंचे दोन थेंब कदाचित
या दिवसा साठीच जपुन ठेवले होते.

------------------------------------------०

राप तापलेल्या ऊन्हा मध्ये
एक मजुर दगड फोडत होता,
मारलेल्या प्रत्येक घावाच्या ध्वनित
तो नविन स्वप्न जोडत होता.

गुलमोहर: 

पारिजात

Submitted by उमेश वैद्य on 23 March, 2011 - 10:17

डोळ्यामधून माझ्या जी आसवे निघाली
धाग्यात वेदनेच्या गुंफून टाक सारी

कचरू नको जराही असुदे गळ्यात माला
रात्रीस जागताना ठेऊन दे उशाला

चंद्रास का कळावे हे गुज तुझे माझे
बेधुन्द तसा ही तो चांदणे प्याला

पहाटेस दोन झाडे लावून कोण गेला
सुकली रातराणी पण पारिजात आला

उमेश वैद्य २०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हा मी आलोच बघ....!!!!

Submitted by विशाल कुलकर्णी on 23 March, 2011 - 08:31

थेट दारात येवून ठेपलास तू
मी दरवाजा बंद करायच्या आधीच...
हलकेच एक पाऊल आत टाकत...
पाठीवर थाप मारत मस्तीत म्हणालास,
"आलो रे मित्रा, सगळे प्रश्न संपवायला!"
आता सगळं माझ्यावर सोपव यार...
सोड नाद त्या अज्ञात प्रश्नांच्या उत्तरांचा,
खरेतर उत्तरे सापडणे महत्त्वाचे नाहीच आहे रे
महत्त्वाचं आहे ते त्यांचा शोध घेणं, ते तू केलंस..
आता पुढचं माझ्यावर सोपव, बिनधास्तपणे!

'खरंय मित्रा'
थोडंसं संकोचून म्हणालो मी...,
'अगदी खरंय तूझं!'
सगळे प्रश्न तूझ्यापाशी येवून संपतात शेवटी!
पण तूच म्हणालास ना? 'शोध महत्त्वाचा'.....
मग शोधच संपला की तूझा उपयोग तो काय?

बस्स, एवढ्या एकाच प्रश्नाचं....

गुलमोहर: 

ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

Submitted by harish_dangat on 23 March, 2011 - 00:19

भावड्या, ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय
आडंनिडं सारं जसा, माजराच्या गळ्यात कुत्र्याचा पाय

आधी म्हटली समदीकडं हाये रिसेशान
आता म्हणती भारी झालय इन्फ्लीशान
रेशनच्या रांगेत लोकं रडती धाय धाय
ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

अर्थमंत्री तिकडं, आय-एम-फच्या घरी पाणी भरी
वर्ल्डबँक पाण्यातल्या म्हशीचा सौदा करी
तरी बजेट दरसाली बोंबलत तूटीत जाय
ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

कम्युनीस्ट तिकडं बसलाय, लावून लाल गोंडा
आपल्याच पायवर हाणतोय, भलामोठा धोंडा
समाजसेवेसाठी फिरवतोय, भांडवलदाराची बाय
ह्या इकॉनॉमीतलं मला काय बी कळत नाय

काय बी म्हण पर, पैसा म्हंजी कागदाचा तुकडा

गुलमोहर: 

आज ही आहे तसा मी काल ही होतो

Submitted by माझिया गीतातुनी on 22 March, 2011 - 12:34

मी भविष्यालाच माझ्या भेटलो होतो
आज ही आहे तसा मी काल ही होतो

सोडुनी वाटेत गेली माणसे माझी
त्याच वाटेला विचारा मी कसा होतो

बोलके डोळे तुला कळलेच नाही का ?
सांगण्या तेव्हाच माझा मी कुठे होतो

जन्म घेणे सांग आहे का कुणा हाती ?
पान गळतीचा कधी मी बहर ही होतो

मी जसा होतो तसा होतो तुझ्यासाठी
जगासाठी निकाली काढलेला फैसला होतो

मयुरेश साने..दि...२२-मार्च-११

गुलमोहर: 

कोडे

Submitted by कल्पी on 22 March, 2011 - 11:31

जीवन कोडी सोडवताना
एक कोडे राहुन गेले
रक्ताला कोड्यात टाकले
आणी कुणी वाहुन गेले

दाटी होते अशीच
रोजच्या पेपरात
चौकोनातले शब्द
अडकले पुन्हा पाशात

गपगार चिवट
अडखळणारी ती वाट
कसं कुठे जुळावे
दुभंगलेले ते घाट

एका एका चौकोणात
चेहरा तुझा बसलेला
कोप-यात निमुटपणे
निटनेटका नटलेला

आता कोरा कोरा
चौकोन चौकोण दिसतो
हाताळणारा तो हात
वर जाऊन हसतो

नाराज झाले सारे
पसरले सोफ़्यात
दाता गेला आमचा
म्हणुन आसवे पूसतात

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

ती कधिच न्हवती

Submitted by कारागिर on 22 March, 2011 - 07:52

माझे मन तिला कधी कळले, कधी नाही कळले
पण ती नाही मिळाली, ती कधीही न्हवती.

मि तीला रस्त्यात गाठलं, कॉलेजात गाठलं
घरात, दारात, ईथे, तीथे
सगळिकडे पकडलं, पण ती नाही मिळाली
ती कधीही न्हवती.

मि तीला उन्हात, पावसात
दिवसा, रात्री,
याच्यात त्याच्यत, सगळ्यात पाहिलं
बघुन हासलो
स्पर्श केले,
तीनी कधि स्पर्श केले, कधि नाही केले
पण तरीही ती नाहीच मिळाली
ती कधीही न्हवती.

मि खुप प्रेम केलं तीच्यावर
हळुवार
कचाकच
शरिराच्या वळणा-वळणाला
खोबणि-खोबणिला हात घातला
पण ती नाहीच मिळाली
ती कधीही न्हवती.

मग मात्र मि भंजाळलो
तीला थोबाडलं, कांठाळलं
मनगट पिरगाळलं
म्हणालो बिच
म्हणालो होअर

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता