अखेरचा सवाल
आणखी काय हवंय आयुष्यात?
ते कसं मिळवता येईल?
काय करावं लागेल?
किती सोसावं लागेल?
अपेक्षापुर्ण करताना भंगलेल्या,
प्रयत्नांना किती काळ पोसावं लागेल?
मनासारखं करताना मनाविरुद्ध
असं किती वागावं लागेल?
वाटेत येईल त्याला जवळ करता करता,
शत्रुंच्या मैलदगडांनाही किती आशेनं पहावं लागेल?
मी चुकतो आहे हे सांगणार्यांची फौज,
मोठी असेल कि तुझंच खरं असं सांगणार्यांची टोळी?
आयुष्यात मोठा होईल कि मोठेपण मिळेल?
अश्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मिळवत मिळवत
काल उराशी आत्मविश्वास अन गाठीशी बक्कळ कष्ट
बांधून झोपलो होतो.
तेवढ्यात दारावरचा कडी-कोयंडा
थरारला आणि आवाज आला,