त्याचे गाव बेपत्ता असते

Submitted by कल्पी on 26 March, 2011 - 11:42

ती नेहमीच तर आठवाशी खेळत असते
खेळताना उगाच जुण्या चिंध्या वळत असते

रात काळी हवीहवीशी नेहमीच असे तिला
अमावसेला ती काळाची महीमा गात असते

उजाड रानात अनवानी फ़िरणे आवडते तिला
दुरवर नजर असते आणी काही गात असते

भर पावसात भरलेली नदी तिचीच होत असते
काट्यांची फ़ुले ओंजळीत भरुन अर्ध्य देत असते

हे जगणे तिचे, माझे काळीज कापत असते
मी नाही नाही करीत तिच्यात गुंतत असते

ऐकले काय अशी कुणाची प्रेमकहाणी केव्हा
का वाट बघावी तिने , त्याचे गाव बेपत्ता असते

कल्पी जोशी

गुलमोहर: 
शब्दखुणा: