सहवास

Submitted by निनाव on 26 March, 2011 - 06:16

क्षितिजा वर मावळतांना तु
मज वर प्रेम करशील का?
श्वासांमधल्या अंतरामधुनी
शोध माझा घेशील का?

समोर दिसून लांब किती तु
जवळ मज येशील का?
अंतर मिटता मिटता
मज तु उमजशील का?

प्रत्येक प्रहर अशी अनोळखी
तु ही मज विसरशील का?
न संपणार्या वाटा कधी ह्या
पलीकडे मज नेशील का?

तुझ्या स्पर्शानं विणलेला शालू
नेसतात लाटा उठणार्या मनी
तारका लाजवतात मज बघुनी
कुशीत मज तु लपवशील का ?

तीच वाट अन तेच प्रवास
न तु इथे, न तुझे सहवास
शोधत तुला फिरते नजर
पुन्हा मज तु दिसशील ना?

क्षितिज उलटून जात असतांना तु
मज वर प्रेम करशील का?
श्वासांमधल्या अंतरामधुनी
शोध माझा घेशील का?

गुलमोहर: 

निनाव -छान आणि मस्त
तुझ्या स्पर्शानं विणलेला शालू
नेसतात लाटा उठणार्या मनी
तारका लाजवतात मज बघुनी
आवडले.पु.ले.शु.