पुन्हा रात्र

Submitted by निनाव on 26 March, 2011 - 17:57

रात्रीचं पांघरूण किती छान असतं
सर्व काही कसं निवांत असतं

असतं आतुन अलगद ऊबदार
मात्र, वर वर कसं गार असतं

झोपायची घाई असतेच कुणाला
ते स्वप्न पडायचं एक दार असतं

अजुनच बहरते रात्र सांगु? जेंव्हा
चंद्र तुझ्या सारखं गोरं पान असतं

तु सोडले असावे केस मोक़ळे
असाच काहिसा भास असतं

एकटेपणाची सोबत लागते गोड
तारुण्याचं बोलकं पान असतं

मारतं मग कुणी चांदण्यांशीच गप्पा
तीच समोर असा ठाम विश्वास असतं

रात्रीच्या पांघरुणात एक मात्र कमाल असतं
अंधारात तिचं यौव्वन कसं साफ दिसतं

तु कुठे दिसली, काय बोलली, हसली
सगळ्याचं रिपीट टेलिकास्ट असतं

रात्रीचं पाघरुण असंच लाजवाब असतं
सगळ्या वयाला एकसमान असतं

सडा पडतो रात्री तिच्या सुगंधा चा मनी
म्हणून तर रातराणीचं झाड असतं

रात्रीचं पांघरूण किती छान असतं
सर्व काही कसं निवांत असतं

असतं आतुन अलगद ऊबदार
मात्र, वर वर कसं गार असतं...

गुलमोहर: 

निनाव -छान नि मस्त -
सडा पडतो रात्री तिच्या सुगंधा चा मनी
म्हणून तर रातराणीचं झाड असतं

रात्रीचं पांघरूण किती छान असतं
सर्व काही कसं निवांत असतं