Submitted by vaiddya on 27 March, 2011 - 09:46
एक कविता असते
आणि
एक शहर असतं
शहराला दिसत नाही काहीही
दिसत नाही
ऐकू येत नाही
जाणवत नाही
वा नाही घेता येत वास शहराला .. कशाचाच !
कविता
शहराच्या खिजगणतीलाही नाही ..
दिपवून टाकणारा झगझगाट
कर्कश्य किंवा दबलेले सततचे आवाज
दुर्गंधी
किंवा
कॉंक्रीटचं आणि डांबराचं अंगावर चढलेलं सोरायसिस ..
या कशानेही शहर बधत नाही
वाढत राहाते ..
हे शहर वाढेल तितकी कविता खुंटणार आहे ..
कवितेला सर्वकाही
दिसतं
जाणवतं
खुपतं
टुभतं
सलतं ..
कारण जाणिवांनी - जाणिवांमधून कविता येते
ती सगळं
पाहू शकते
ऐकू शकते
जाणिवांत साठवत असते
श्वासांत वेचत बसते
म्हणूनच कविता
अपंग ठरते ..
या अनिर्बंध
अमर्याद वाढत जाणार्या
प्रबळ शहरापुढे !
गुलमोहर:
शेअर करा
कविता छान आहे, पण शहरातून
कविता छान आहे,
पण शहरातून सुद्धा कविता बहरत असते, बर का?
कदाचित, संवेदना वेगळ्या प्रकारच्या असू शकतील, नाही का?
क्या बात है ! वैद्य, तुम्ही
क्या बात है !
वैद्य, तुम्ही खरंच "कविता" जगलात....ती जाणवावीच लागते.
प्रदीप वैद्य , नाही का
प्रदीप वैद्य , नाही का !
अतिशय सुंदर कविता.