मी..फक्त मी..
इथे बसू नका,तिथे जाउ नका
याच्याशी बोलू नका,त्याच्याशी बोलू नका
हा वाईट, तो चोर
मीच फक्त सज्जन
अन
मीच तो थोर
इथे बसू नका,तिथे जाउ नका
याच्याशी बोलू नका,त्याच्याशी बोलू नका
हा वाईट, तो चोर
मीच फक्त सज्जन
अन
मीच तो थोर
सांस भी न लू इस जिंदगीमें
जुस्तजू थी मेरी
हाय खुदा......
बक्श दी लंबी जिंदगी १
अर्ज है.........
जनाजा उठे जवानीमें
तौहिम बस इतनी कर जिंदगीमें २
ही वाट वेदनेची चालून आज आलो,
ऐका गझल अशी जी चाळून आज आलो.
हातात मी निखारे घेऊन धावताना,
माझ्या नशीबरेषा जाळून आज आलो.
डोळ्यात दाटलेले आभाळमेघ होते,
गालांवरी सरींना गाळून आज आलो.
दु:खास सूर होते नासूर बोचणारे,
काळीजपुष्प माझे सोलून आज आलो.
राज्याभिषेक झाला आनंद तो क्षणाचा,
काटा-किरीट डोई घालून आज आलो
वाहून पार गेले 'जीवन' कसे कळे ना,
'काळा'कडे पुलाच्या खालून आज आलो.
हे भोग प्राक्तनाचे नर्कात भोगतो मी,
दु:खे जराजराशी टाळून आज आलो.
या झाडावर हा कुठला रोग पडलाय
की हिरमुसून गेलंय सगळं जंगल
मला असं वाटतं की ही जुनी झाडं
जगली पाहिजेत खूप दीर्घ काळ
डोळ्यांमधले चंद्र दुधाळेपर्यंत
म्हणजे मला कल्पिता येतील
या झाडांसमेत
इतिहासातली पात्रे
आज संध्याकाळपासून
खूप जोराचा वारा वाहतो आहे
आणि मला या भिरभिरणाऱ्या पाचोळ्याकडे पाहून
ढीगभर रडावंसं वाटत आहे.
अनंत ढवळे
काल पाहिली मी तिला
पावसात चिंब भिजलेली
माळुन अगणित मोती
इंद्रधनुत सजलेली..............
काल पाहिली मी तिला
पहाटेच्या धुक्यात वेढलेली
ओझरत्या स्पर्शाने तिच्या
ही हवा गुलाबी झालेली........
काल पाहिली मी तिला
चांदण्यात निजलेली
तिच्या स्वप्नांच्या दुनियेत
सारी रात्र रमलेली..............
काल पाहिली मी तिला
क्षितिजावर विसावलेली
सांज उतरुन गेल्यावरही
संधिप्रकाशात उरलेली............
चला मस्त तारुण्य फुललेय
जरा मजेत जगूया
कसे जगायचे त्याचे स्वातत्र्य घेऊया
कशे प्रेम करायचे त्याचे गणित आपणच ठरवूया
कशाला करायची कुणाची कॉपी
आपण आपल्या पद्धतीने जगूया
चला जरा मस्त सूर लावूया
शोभादर्शक नि त्यात रंगीत काच तुकडे
कसे छान शोभादर्शक बनते
तसे काही तरी करुया
प्रेमाचे क्षण आपल्याला हवे तसे
आपल्या मनात मांडूया
जमेल [?]
खरेच जमेल ..!
प्रयत्न करुया ..!!
कशासाठी कुणाला लाजून
प्रेमाचे सूर लपवायचे
कुणावर असेल प्रेम तर कशासाठी दडवायचे ?
ती आली त्या दिवशी
कसे ढग भरून आले होते
निळ्या निळ्या साडीमध्ये
तिचे मन फुलत होते
लाख जुन्या त्या सुरुवातींवर
नवी सुरुवात करावी लागेल
खूप उशीर होणापूर्वी
लगेच सुरुवात करावी लागेल!
शेतकरी मी स्वप्ने पाही
कधी न भरल्या कोठाराची
नवे कर्ज अन् जुने बियाणे
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
ग्रंथही सारे कालच मिटले
फोल!रितेपण त्यांचे कळले
पण धूळ तयांवर जमण्यापूर्वी
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
डावा झालो रस्ता चुकलो
उजवा होता मार्गा मुकलो
जीवन तारेवरची कसरत
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
संकट येई मानवनिर्मित
नैसर्गिक वा लाटा येती
खेळ मांडण्या नवा वाळुचा
पुन्हा सुरुवात करावी लागेल!
अंतरातला देव येतसे
परत फिरूनी जाण्यासाठी
त्याच्या येण्याकरिता क्षणभर
मलाही कधीतरी वाटायचे,
कोणितरी आपल्याकडे पहावे,
गालातल्या गालात हसावे,
प्रेमाचे धडे गिरवावे
दिवस हि तो आला सत्वरी,
माझ्याही आयुष्यात आली एक परी,
कोण कुठली ठाउक नव्हती ती सुंदरी,
हृदयाला घायाळ करून गेली तरी
करीत होता लपंडाव नजरे-मनाचा खेळ,
मैत्रीचे नाते गुंफन्यास लागला नाही वेळ,
तीच्या-माझ्या हृदयाचा चांगलाच जमला मेळ,
दर्शन न होता एकमेका, मनाची होई घालमेळ
तीच्या बोलण्यातले शब्द मला होते काही सांगत,
पण त्या शब्दाचे कोडे मला नव्हते उमगत,
प्रेमाची भाषा तिची नजर होती बोलत,
पण या "अद्न्याला" नजरेचा अर्थच नव्हता कळत
प्रेमाचा अथांग सागर तिच्या हृदयातून होता वाहत,
गाव म्हन्जे गाव असत
शहरात कधि गाव नसत
सगलयांच गाव असल तरी
तुमच आमच सेम नसत
गाव म्हन्जे गाव असत
गावामधे सुख़सोई नसतात
तुमच्या गावी असल्या तरी
आमचया त्या नसतात
गाव म्हन्जे गाव असत
तिथे प्रेमाला नाव नसात
तुमच्यकड़े लव असल तरी
आमचयाकड़े ते प्रेमच असत
गाव म्हन्जे गाव असत
खूप मागासलेल असतत
तेच तर खर गाव असत
सुधारलेल ते शहर असतत
गाव म्हन्जे गाव असत
शहरापासुन दूर असत
सह्यद्रिच्या कुशित असत
“वावे” त्याच नाव असत
गेले कैक पावसाळे
मी इंद्रधनूचे रंग साठवत होतो,
त्यात वसंतातल्या फुलांचे आणि
शिशिरातल्या पानांचेही रंग मिसळले.
म्ह्टल, 'तू भेटशील तेव्हा तुझ्या सर्वांगावर
जपलेला एकेक रंग उधळेन.'
अनायासे आज पंचमी..
माझ्या परडीतले सगळे रंग
मी आज मोकळे केले..
तुझ्या नितळ त्वचेला बिलगून
तेही सुखावले.... माझ्यासारखेच.