फसवे ऋतु निघाले...

Submitted by rutuved on 26 March, 2011 - 09:34

शोधू कुठे कसा मी..ना ठाव,संग त्याचा
वाऱ्यासवे उडाला आनंद अंतरांचा...१

होती उगाच खोडी अन माग सावल्यांच्या
पळत्या क्षणात सरला तो खेळ जाणिवांचा ..२

हसलो असे कितीही,ना शल्य दूर झाले
येत्या उन्हासवे ते पर्जन्य हि जळाले....३

असता अलभ्य ठेवा, वेळूत लुब्ध झालो
जनमानसात आता हरण्यास सिद्ध झालो..४

होती जरी कितीही माया सभोवताली
तू टाकलेस अन मी ,माझ्यासवे बुडालो...५

....ऋतुवेद

गुलमोहर: 

Happy छान..!

होती उगाच खोडी अन माग सावल्यांच्या
पळत्या क्षणात सरला तो खेळ जाणिवांचा ..२>>> व्वा!

होती जरी कितीही माया सभोवताली
तू टाकलेस अन मी ,माझ्यासवे बुडालो...५>>> व्वा!

मस्तच!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!