सगळ्या पक्ष्यांची भाषा एक असते
येथे, तेथे कोठेही
ह्या गावात
ह्या शहरात
देशात ,परदेशात ..!!
ह्या परदेशात त्याला पक्ष्यांचीच आपुलकी
त्यांच्या नजरेत तोच प्रेमळपणा
किंवा आपलेपणा
ती उडत असतात त्याच्या डोक्यावरून
तेव्हा ती किती आपली वाटतात
आपल्या गावची वाटतात
कोठेतरी आपलेपण असतो त्यांच्या नजरेत
पक्ष्यांची भाषा एक तशी प्रेमाची भाषा [?]
प्रेमात भाषा नसते
त्यात असते नजरेची जादू
शब्दकोश न बघता
अर्थ उलगडत जातो
त्या नजरेचा संदर्भ लागत जातो
आणि शप्पत आपण हरवून जातो ....
तिच्या प्रेमात तो
लवथवते तारुण्य
परक्या ठिकाणी परका
कोणी प्रेम देतोय
शब्दांच्या अतीत अर्थांचे बहाणे
प्रेमाचे बहरणे अलगद फुलत जाते
फुलासारखे फुलून जाते
पक्ष्यांची भाषा एक असते
प्रेमाला कोठे भाषा असते ,,,?
काही न करता ती उलगडत जाते
संदर्भहीन शब्दांसारखी
शब्दकोशात न बघता
ती एकदम आपली होऊन जाते ....!!
सगळ्या पक्ष्यांची भाषा एक असते
येथे, तेथे कोठेही
ह्या गोलजगात
प्रेमाला मात्र भाषा नसते
नजरेची भाषा
भाव
कोणत्याही शब्दकोशात नाही
हृदयात गवसत असते ....!!
झक्कास्स!!!!! एकदम सुंदर
झक्कास्स!!!!!
एकदम सुंदर वर्णन.
तिच्या प्रेमात तो
लवथवते तारुण्य
परक्या ठिकाणी परका
कोणी प्रेम देतोय
शब्दांच्या अतीत अर्थांचे बहाणे
प्रेमाचे बहरणे अलगद फुलत जाते
फुलासारखे फुलून जाते
सह्हिच लिहिले आहे प्रकाश दा तुम्ही.. वाह....मनात उतरले शब्द थेट.
चांगली वाटली.
निनाव आणि के.अंजली - खूप आभार
निनाव आणि के.अंजली - खूप आभार !!
नादखुळा..........
नादखुळा..........