काच

स्वप्न

Submitted by तो मी नव्हेच on 10 August, 2020 - 06:18

काचेवरच्या दवबिंदूंचे स्वप्न पाहिले कुणी
अन् काचेवरच्या दवबिंदूंवर स्वप्न रेखिले कुणी

कोणी जगती गत काळातच, बघती स्वप्ने जुनी
लढती काही मार लढाया, तर प्रेम सजवते कुणी

कोणी जगती स्वप्नीच नुसती, कोणी त्या मारती
अन् कुणाच्या स्वप्नांनाही वाहवा मिळते जनी

स्वप्न रंगते ज्याचे त्याचे, नसते सीमा जरी
जो तो पाही स्वप्ने जितकी उर्मी वसते मनी

मी ही जपतो माझी स्वप्ने, अलवार माऊली परि
मीच असतो तिथला ईश्वर, नव सृष्टि घडते मनी

- रोहन

शब्दखुणा: 

रिसायकल, रियुज, रिपर्पज - काच

Submitted by नीधप on 30 September, 2015 - 06:08

काचेच्या बाटल्यांचे काय करू असा प्रश्न विचारल्यावर बरेच उपाय आणि उत्तरे पुढे आली.
तपशिलात चर्चा करायला तो धागा योग्य नाही त्यामुळे इथे चर्चा करूया.

काचेच्या बाटल्या व वस्तू आपण कश्या कश्या प्रकारे रिसायकल, रिपर्पज, रियुज करू शकतो याबद्दल इथे लिहूया.
यामधे अमुक प्रकारच्या बाटल्यांमधे अमुक वस्तू चांगल्या राहतात पासून काचेच्या बाटल्यांपासून करता येण्यासारख्या कलाकुसरीच्या वस्तूंची कृती, इतर उपयोग या सगळ्यांचा समावेश होऊ शकतो.

मात्र मटेरियल काच हेच असायला हवे.

प्रयोगशाळेतली काचेची भांडी कुठे मिळतील?

Submitted by सावली on 20 September, 2013 - 01:55

ठाणे मुंबई येथे प्रयोगशाळेतली काचेची भांडी कुठे मिळतील?

मिळाली इथे
Neha Enterprises
Mr. Narendra Kale
G-5, Ground Floor, West View Building, Hindu Colony, Near Karve Hospital, Brahmin Society, Naupada
Thane - 400602, Maharashtra , India
Mobile:
+(91)-9004032862

विषय: 

बिघडलीये काच!

Submitted by नीधप on 9 April, 2011 - 02:57

जुनी कविता परत टाकलीये
----------------------------------
खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

मी आक्रसत रहाते स्वतःला.
त्याचा फोन..
एखादी धुंद आठवण..
एक गम्मतनाच..
जुनेपाने कपडे घालून वावर..
देहामनाची तगमग...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी आक्रसत रहाते..
चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात

खरंच
बिघडलीये ही काच
बदलली पाहिजे!

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - काच