Submitted by डॉ अशोक on 9 April, 2011 - 13:10
गझलचं पझल
उंटावरच्या स्त्री सारखा
रदीफ चिकटून होता
चार काफिये दौडत आले
पण, फौजफाटा अपूरा होता
अलामतची बिलामत
अंगावरच आली
तखल्लूसची युक्तीसुद्धा
कामी नाही आली
मुसलसल गैर-मुसलसल वादात
आपण नाही पडलो
मात्रावृत्त की गणवृत्त यासाठी
आपण नाही रडलो
मतला फारच मातला तेंव्हा
शेर पुढे आला
एका शेरावर पावशेर घेतला
तेंव्हा कुठं डोळा लागला
हे गझलचं पझल काही
आपल्याला सुटलंच नाही
"इर्शाद"चं दान काही
पदरात आपल्या पडलंच नाही !
-अशोक
गुलमोहर:
शेअर करा
मुसलसल गैर-मुसलसल वादात आपण
मुसलसल गैर-मुसलसल वादात
आपण नाही पडलो
मात्रावृत्त की गणवृत्त यासाठी
आपण नाही रडलो>>> हे मस्त!
अशोकजी - भन्नाट !! मतला फारच
अशोकजी - भन्नाट !!
मतला फारच मातला तेंव्हा
शेर पुढे आला
एका शेरावर पाशेर घेतला
तेंव्हा कुठं डोळा लागला
छान आहे
छान आहे
बेफिकीर आणि प्रकाश आपले
बेफिकीर आणि प्रकाश
आपले आभार.
बेफिकीर जी...
एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की ही कविता आपला "गझल परिचय - पार्श्वभूमी, दृष्टिकोन, तंत्र व आशय" हा लेख वाचल्या नंतर सूचली आहे.
-अशोक
लै भारी....!!
लै भारी....!!
वाह्ह्ह्ह्ह !! अवांतर :यावरुन
वाह्ह्ह्ह्ह !!
अवांतर :यावरुन आठवले ...एकदा "सुप्रसिध्द गीतकार जगदीश खेबुडकरांनी " एक गजल (?) / गीत(?) /कविता (?)
लिहिली होती .....
" काव्य करता येईना , ही गजल आहे
गजल या रचनेस थोडी मजल आहे "
त्याला उत्तर म्हणुन अनंत नांदुरकर "खलीश " या शायराने मस्त उत्तर दिले होते
" हा वृथा अभिमान आता तोड रसिका
भावनांना शब्द सारे गोड रसिका |
.
.
बिनबुडाची खेबुडी सारी विधाने
हो जरा जगदीश कोते सोड रसिका " :खोखो
अर्थात आपल्या कवितेशी संबण्ध नाही सहज आठवले म्हणुन सांगितले
वाह वा !क्या बात है !
वाह वा !क्या बात है !
प्रतिसाद देणा-या सर्व
प्रतिसाद देणा-या सर्व रसिकांचे हार्दिक आभार !!
मात्र कवितेच्या चौथ्या कडव्यात खालील प्रमाणे दुरुस्ती आहे
-अशोक
मतला फारच मातला तेंव्हा
शेर पुढे आला
एका शेरावर पावशेर घेतला
तेंव्हा कुठं डोळा लागला