बिघडलीये काच!

Submitted by नीधप on 9 April, 2011 - 02:57

जुनी कविता परत टाकलीये
----------------------------------
खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

मी आक्रसत रहाते स्वतःला.
त्याचा फोन..
एखादी धुंद आठवण..
एक गम्मतनाच..
जुनेपाने कपडे घालून वावर..
देहामनाची तगमग...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी आक्रसत रहाते..
चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात

खरंच
बिघडलीये ही काच
बदलली पाहिजे!

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

>>> वाह मस्तच !!

सगळ्यांचे आभार..
डुप्या, किमान दोन वर्ष जुनी आहे.
मंदार, खिडकीच्या काचेत प्रतिबिंबं दिसणं इथूनच बिघडलंय ना. ते असो. मला लिहिताना खरोखरच्या खिडकीच्या काचेत प्रतिबिंबं दिसली आणि पुढचं सुचलं इतकंच.
मंजू, आपलातुपला गंमतनाच वेगळ्या कवितेतलं आहे. गमतीची गोष्ट असं शीर्षक आहे त्या कवितेचं. आहे माझ्या पाखु मधे.

देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

सही! खूप खूप आवडली.

देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

आवडली कविता.
भिडेकाकांशी सहमत !

शुभेच्छा!

बिघडलीये ही काच >>> काच बिघाडायला ती काय कार आहे की मोबाईल ? लोकांना काय लिहाव ते सुद्धा कळत नाही. काहीतरी फालतु लिहिलय.

येस्स! आणि मला वाटतं की त्यावरुन गेल्यावेळेस जरा खडाखडीही झाली होती! (अस्ल्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात Proud )

आधीही वाचली होती. आवडलीय Happy

मुक्तछंदाचा स्वतःचा असा एक फ्लेवर आहे. चौकटीत बसवायला शब्दांची अनावश्यक ठिगळं लावावी लागत नाहीत.

नी, नेमकं काय बिघडलंय काच कि आख्ख घर?
घरघर जास्त जाणवली म्हणून विचारलं.
बाब्या, तु तर 'हिरकणी' गावल्यासारखाच बोलायला लागलायेस जणू ! गावली असेल तर तुकडोंमे बाट लेंगे.