प्रतिबिंब

बिघडलीये काच!

Submitted by नीधप on 9 April, 2011 - 02:57

जुनी कविता परत टाकलीये
----------------------------------
खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.

मी आक्रसत रहाते स्वतःला.
त्याचा फोन..
एखादी धुंद आठवण..
एक गम्मतनाच..
जुनेपाने कपडे घालून वावर..
देहामनाची तगमग...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी आक्रसत रहाते..
चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात

खरंच
बिघडलीये ही काच
बदलली पाहिजे!

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

हा खेळ सावल्यांचा .....

Submitted by विशाल कुलकर्णी on 25 February, 2011 - 00:02

सगुणाबागेत टिपलेली दोन प्रकाशचित्रे .....

प्रचि १ : तिथले पाँड हाऊस आणि त्याचे पाण्यात पडलेले देखणे प्रतिबिंब....

प्रचि २ : तळ्याकाठी असलेली नारळाची झाडे आणि त्याचे पाण्यात पडलेले मनोरम प्रतिबिंब....

याच दोन्ही जागांची रात्री (मावळतीच्या वेळी) जरा वेगळ्या कोनातुन घेतलेली प्रकाशचित्रे...

गुलमोहर: 
Subscribe to RSS - प्रतिबिंब