रदीफ

गझलचं पझल

Submitted by डॉ अशोक on 9 April, 2011 - 13:10

गझलचं पझल

उंटावरच्या स्त्री सारखा
रदीफ चिकटून होता
चार काफिये दौडत आले
पण, फौजफाटा अपूरा होता

अलामतची बिलामत
अंगावरच आली
तखल्लूसची युक्तीसुद्धा
कामी नाही आली

मुसलसल गैर-मुसलसल वादात
आपण नाही पडलो
मात्रावृत्त की गणवृत्त यासाठी
आपण नाही रडलो

मतला फारच मातला तेंव्हा
शेर पुढे आला
एका शेरावर पावशेर घेतला
तेंव्हा कुठं डोळा लागला

हे गझलचं पझल काही
आपल्याला सुटलंच नाही
"इर्शाद"चं दान काही
पदरात आपल्या पडलंच नाही !

-अशोक

गुलमोहर: 
Subscribe to RSS - रदीफ