रिती झोळी

Submitted by अज्ञात on 8 April, 2011 - 10:24

का कातर वेळी कोप तुझा
मी संध्या तुझि रे भेटखुळी
एकांत विरहिणी निशा कुढे
चंद्रिकाहि झुरते गोप कुळी

राशींभवती नक्षत्रांची
वलयांकित तव सलगी खेळी
अंगार अंग लाही वणवा
अंतरी भावनांची होळी

सल छळे रात्रभर जळे कुडी
राखेची घरभर रांगोळी
पापणी लवे साखर प्रहरी
रजनी स्वप्नात; रिती झोळी

....................अज्ञात

गुलमोहर: 

छान

मस्त विरहिणी गुरूजी !!

"भेटखुळी" नवा शब्द सापडला, मी चोरणार नक्की Wink