आज अवसेची रात आहे..............

Submitted by अमोल परब on 17 April, 2011 - 01:31

माझी ही कविता......
ज्यांचे नवरे कुणालाही न कळ्वता वर्षानुवर्ष परागंदा झालेले आहे.......
आणि केवळ त्यांच्या मरणाची खबर नाही या एका आशेवर त्यांची वाट पहाणार्‍या त्यांच्या बायकांना समर्पित.....

गेला दिस वेशीपार
ना चांदण्याला जाग आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................

भोवतालच्या सावल्या
गेल्या परतुनी घरा
मागे उरली एकटी
मीच माझ्या संगतीला

भिवलेल्या माझ्या मना
तुझ्या आठवांची साथ आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................

वारा सुटला मोकाट
नावे साद मला घाली
तुला पाहता ना घरे
वैरी अंगचटीस लागी

घडु नये काही भलते
अघोरी त्याचा चाळा आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................

उलटल्या कैक राता
उरी बाळ्गुनी ठेच
देह ठेवला कधीचा
तरी सुटेना हा जाच

मोकळा होउ पाहे परी
या जीवा तुझी आस आहे
सख्या ये बिगीने घरा
आज अवसेची रात आहे..................

गुलमोहर: 

ज्यांचे नवरे कुणालाही न कळ्वता वर्षानुवर्ष परागंदा झालेले आहे.......:खोखो:

आज अवसेची रात आहे..................
हे आवाहन कि इशारा ?

मस्त कविता

वेदनात्मक! आशात्मक्!सुखकारक!

ज्यांचे नवरे कुणालाही न कळ्वता वर्षानुवर्ष परागंदा झालेले आहे.......>> अगदी.