दूर वाट अशी ही

Submitted by निनाव on 16 April, 2011 - 08:39

दूर वाट अशी ही छळणारी
वळणावर अलगद निजणारी;
रात्र मोजती अंतर किती
अंतरावर तुझ्या ही सळणारी.

ह्रदयी टोचते ही पानगळ
मनास बोचतो गार वारा;
येशील कधी तु सांग सख्या रे
झुंझते वात ही विझणारी.

नागिण विरहाची भिरणारी
आवळते पाश भोवती मज असा;
येशील कधी तु सांग सख्या रे
विषदंश हर-क्षण ही घेणारी.

खडू आठवणींचे नदीत टाकतांना
तरंग एक एक उठणारी;
येशील कधी तु सांग सख्या रे
जगेल तरंग का ही विरणारी.

गुलमोहर: