Submitted by zaad on 16 April, 2011 - 14:06
तुझ्या माझ्यातील आदिम बंधावर
कुठलेही संस्कार होण्याआधी
मला तुला खोल मिठीत घेऊ दे...
ओठांना ओठांनीच जाणवू देत
आत उसळणा-या रक्ताचे उष्ण प्रवाह,
हळूहळू नष्ट होऊ देत सभोवतालचं समग्र अवकाश...
रक्तात उतरलेल्या उत्क्रांतीच्या सर्वच खूणा
नाहीशा होऊन रक्त पुन्हा पोचू दे
त्या आदिम बिंदूपाशी जिथून ते पहिल्यांदा
वाहू लागलं स्पर्शांच्या चुंबकीय धमन्यांतून...
दोन जीवांना एकजीव करणा-या लिपीचा
सृष्टीत शोध लागला
त्या बिंदूवरून ओसरत खाली येताना
मग ठरवू सावकाश
या नात्याचं नाव काय?
या नात्यातले शिष्टाचार कोणते?
या नात्याची संस्कृती कुठली?
तुझ्या माझ्यातील आदिम बंधावर
कुठलेही संस्कार होण्याआधी
मला तुला खोल मिठीत घेऊ दे...
गुलमोहर:
शेअर करा
दोन जीवांना एकजीव करणा-या
दोन जीवांना एकजीव करणा-या लिपीचा
सृष्टीत शोध लागला
त्या बिंदूवरून ओसरत खाली येताना
मग ठरवू सावकाश
या नात्याचं नाव काय? व्वा मस्त !!
सर्वच सुंदर
परत एकदा नेहमीप्रमाणेच....
परत एकदा नेहमीप्रमाणेच.... अशक्य खास!
!!!!!!!!!
!!!!!!!!!

(No subject)
खल्लास, आवडली.
खल्लास, आवडली.
वाह...
वाह...
अहा.. कातिल !!
अहा.. कातिल !!
सर्वांचे खूप खूप आभार!
सर्वांचे खूप खूप आभार!
खासच !
खासच !
धन्यवाद अवल!
धन्यवाद अवल!
क्या बात है ! फर्मास !!!
क्या बात है ! फर्मास !!!
zaad खूप खूप आवडली कविता !
zaad खूप खूप आवडली कविता !
मग ठरवू सावकाश... आहाहा...
गिरीश, नादखुळा... खूप खूप
गिरीश, नादखुळा... खूप खूप आभार!
खुपच मस्त.
खुपच मस्त.
खासच !! आवडेश....
खासच !! आवडेश....
ज ह ब ह रा !!!
ज ह ब ह रा !!!
(No subject)
क्या बात है! नात्याच्या
क्या बात है! नात्याच्या व्याख्येचे आणि उगमाचे स्त्रोत ठरावे अशी कविता.
धन्यवाद मंडळी!
धन्यवाद मंडळी!
ग्रेट .
ग्रेट .
खूपच आवडली ,सूंदर
खूपच आवडली ,सूंदर
आवडली!!
आवडली!!
मस्त!
मस्त!
तुझ्या माझ्यातील आदिम
तुझ्या माझ्यातील आदिम बंधावर
कुठलेही संस्कार होण्याआधी >> !! क्या बात है!
आवडली.
क्या बात है!!!
क्या बात है!!!
सर्वांचे मनःपूर्वक आभार!
सर्वांचे मनःपूर्वक आभार!