Submitted by उमेश वैद्य on 16 April, 2011 - 11:17
मायबोलीकरांची वर्गवारी आणि आत्मपरिक्षण हा सानी यांचा लेख वाचला आणि
मन विशण्ण झाल. त्या वर हे सुचल...
म्हणे 'मायबोलीकर'
जरी येथ असती कुत्सीत कुटाळ
तो एक विटाळ मासीक धर्म
आपुलीये मराठी म्हणवीती 'माय'
वागणे ते काय कलंकित
येथ वावरती करूनिया 'कंपू'
एकटे संपू ऐसे वाटे?
मायमराठीची येथ होय पूजा
नसो भाव दूजा राऊळामाजी
जे येथ येई साहित्य लेणे
पुष्प ते वहाणे मराठीला
ऐशा कुसुमांस असो वा सुवास
नसता कशास काय उणे?
म्हणती स्वतःस 'मायबोलीकर'
परी फार दूर अ-क्षर मार्गी
कसे पहा कोणा आम्ही बोळविले
त्यांसी पळविले मारीती शेंखी
ऐसी जी करणी ज्या वाटतसे रस
होईल निरास सकल भ्रम
माय मराठीचे भोगतील श्राप
येतील जन्मास अ-मराठी.
उमेश वैद्य २०११
गुलमोहर:
शेअर करा
दुर्लक्ष करणे - हाच एक उपाय
दुर्लक्ष करणे - हाच एक उपाय उमेश.
बाकि, तुमची कविता छानच. :). असेच लिहित रहा. वाचत आहे.
येथ वावरती करूनिया
येथ वावरती करूनिया 'कंपू'
एकटे संपू ऐसे वाटे? >>>
क्या बात है उमेश. आवडले.