डबके

Submitted by राजेश्वर on 16 April, 2011 - 04:46

उजाडले तरी किती?
मनाला मनातच विचारले
काहितरी करायचे राहिले
असे नेहमीचेच झाले

फ़ायदा दिसलाच नाही
सर्व सल्ले हवेतच गेले
मित्रही म्हणे भेटुन गेले
मी उभा बसतच राहिलो

जाउ दे, नशिबच विकावे
असे कसे म्हणावे? पण
प्रयत्न वेडया अजुन असावे
आपले आपण ही शिकावे.

हेच ते समाधान
दुर ढकलत नेहमी हसते
डबके जरी असले तरी
खोल वाटु लागते.

गुलमोहर: 

राजे, एकदम मस्त कविता आहे! आवडली.... Happy

जाउ दे, नशिबच विकावे
असे कसे म्हणावे? पण
प्रयत्न वेडया अजुन असावे
आपले आपण ही शिकावे. >>> एकदम आशावादी Happy

राजेश्वर,
सुंदर प्रयत्न. मस्तच आहेत काही ओळी.

जाउ दे, नशिबच विकावे
असे कसे म्हणावे? पण
प्रयत्न वेडया अजुन असावे
आपले आपण ही शिकावे.

-- हे खूप आवडले.

- निनाव.