स्थलांतर

Submitted by नीलमभिडे on 15 April, 2011 - 14:18

संदर्भः
लहान असल्यापासून बाबांच्या नौकरी निमित्त खूप वेळा घर बदली करावे लागले. त्यात बरेच काही सुटले, मागे राहूनि गेले. मन फरफटले गेले सामाना सोबत. ही कविता काही वर्षांपुर्वी लिहिली होती. आजच मा.बो वर आले आहे, तेन्व्हा इथे देत आहे. इंग्रजी कि-बोर्ड असल्या मुळे चुका झाल्यास माफ करावे. अजुन हाथ बसला नाहिये.

स्थ्लांतर

पाउले पडत होती भराभरा घराकडे
अन असंख्य विचार घुमत होते मना मधे
शहर सोडण्याची तयारी झाली असेल का?
सामान सगळे बांधले असेल का?

बाबांनी काढले होतेच तिकिट परवाच
नातेवाईक सगळे जमले असतील का?
पोहोचताच घरी मन झाले अजुनच जड
ह्या वॄंदावनाची ओवाळेल आरती कुणी का?

भेटून झाले सर्व मैत्रीणींना आज
अन देवाण घेवाणही झाली भेट वस्तुंची
मात्र, मन किती वाटले गेले कसे सांगू
पुन्हा कधी हे तुकडे जुळतील का?

कधी जाणवले नव्हते पक्ष्यांचे हे दुख्ख
स्थलांतरण ॠतु प्रमाणे करावे लागावेच का?
वसलेलं बस्तान पुन्हा बांधा पाठी
करावी लागेच मनाची पुन्हा मांडणी का?

ह्या सगळ्या खेचा-खेचीत सुटल्या मागे किती तरी गोष्टी
त्यांची यादि कुठे करता येईल का?
कुंड्या लावून आंगण सजवून घराचे
फुलांचे सुगंध सोबत नेता येईल का?

नीलम.

गुलमोहर: