जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती.
------------------------------------------------
आज.. उद्या... कधीतरी..
या तालातच आतलं काहीतरी फिरतंय.
खूप खूप ठासून भरल्यासारखं काहीतरी आहे.
स्फोट व्हावा किंवा गळू फुटावं,
तसं ते बाहेर येणार.
वाट बघणं चालू आहे.
स्फोटासाठी सुद्धा एक काडी लागते,
गळू फुटण्यासाठीही एक वार लागतो,
प्रचंड वेदनेच्या पोटी सगळा निचरा होऊन जातो.
मी त्या काडीची, त्या एका वाराची वाट बघतेय का?
एवढी मोठी वेदना सोसण्याचं बळ खरंच माझ्यात आहे?
हे असले प्रश्न येतात मनात आणि तिथेच..
माझ्या मिडीऑकर असण्याची खूण पटायला लागते
चंद्र वरी आला, सूर्याचा अलविदा झाला
वाहे शांत वारा, क्रम रोजचाच झाला
तुझं मात्र हल्ली गणित चुकलंय
मी वाट बघतोय
ठिकाणालाही अता हे कळलंय
तेही बुचकळ्यात पडलंय
ते गवत बसलंय रुसून
तिथे नाहीत तुझी पावलं सजून
त्या दगडाची झालीये चुळबुळ सुरु
त्यावर कुणी टेकलं नाही अजून
वाऱ्यालाही त्या लागलेत वेध
खेळायला मिळाले नाहीत अजून तुझे केस
पिवळी फुलं आलीयेत खुलून
त्यांच्याकडे लक्ष जातंय म्हणून
ही वाटही अता लाजतीये भारी
त्यावर नाही आली अजून तुझी स्वारी
म्हणे माझ्या कडे पाहशील किती
भाव अता असा मला देशील किती
आली ती कि हा माझा राहणार नाही थाट
दाखवशील बघ तेंव्हा मलाच वाट
ते स्वप्न म्हणू की
सत्यची घडले सारे ?
तीज कविता म्हणू की
होते त्याचे भाव खरे ?
किणकिणल्या सार्या
त्या होत्या का तारा ?
की हृदयची माझे
झंकारियले होते ?
हळुहळुच येउनी
शीळ घालूनी गेला तो वारा
कि निश्वासच त्याचा
मज कुरवाळुनि गेला ?
क्षण कुणी असा हा
गंधीत करुनि गेला ?
हा धुंद मारवा
कि या पाऊसधारा ?
कि तोच तो हा
मज आजवरी जो
खेळ अनोळखी
प्रितीचा हा सारा ?
आजवर तळहातावर
खेळवलेत बरेच शब्द..शिलकीतले..
नि त्यांच्याच बरोबर असेच काही खेळ...
ओझरतानाचे बहर,
सुरावटीतले कहर,
माझघरातली पेटी,
उंबर्या वरची दाटी,
डोंगरभर पहाट,
द-यांचे काठ,
मोग-याचा गंध,
ता-यांचा संग,
चंद्राचा थाट,
नि वातीचा विझता थयथयाट..
सांडून गेल्यावर
सांजेला वाटत असतील तसे..
स्फुरलं काय..नी उरलं काय...
याचे हिशोब आज किती क्षुल्लक वाटले!
तरीच...
तळ्हाताच्या रेघांना
आजकाल फक्त शिल्लकीचेच हिशोब कळतात म्हणे!
ऋतुवेद
ठरवलं असतं तर..
माझ्याही देहाला जडले असते शुभ्र पंख,
मी सुद्धा झेपावले असते उंच आकाशी,
परतताना जमिनीवर मी सुद्धा
वेचून आणले असते चंद्र तारे !
जर मी चालायचंच ठरवलं असतं तर..
प्रत्येक बंद दरवाजांना उघडून..
आणि सागरा किनारी लोटून
भेटल्या असत्या हजार वाटा,
आणि शांत स्तब्ध सोनेरी लाटा !
जर मी जपले असते प्रत्येक क्षण,
तर प्रत्येक चंदेरी क्षणांच्या मोत्यांची माळ,
गळा गुफूंनी सजले असते..
आणि स्वतःलाच उजळताना मनभरून पाहीले असते !
पण .. मला आठवतेय ..
माझ्या माईने सांगितलेली गोष्ट,
जिथे एक राजकुमारी रोज
गुलाबपाण्याने स्नान करायची,
फुलपाखरांचे पंख खांद्यावरी अन
ती संध्याकाळ....
आणि...,
तुझ्या डोळ्यांतल्या नितळ काजव्यांचा
अविष्कार पहाण्यासाठी...,
मी तुझ्या दारात आलो होतो!
तुला माझा भास झाल्यावर....
तुझे दरवळणारे श्वास सावरत...,
तू प्रश्नार्थकपणे विचारलीस,
" कोण आहे ?"
फक्त "मी" ! मी म्हणालो!!
तुझ्या हातात विश्वासाची...
मेणबती उजळतच होती!...,
आणि माझा मात्र अट्टाहास...
तुझ्या डोळ्यांना आणि तुझ्या चेहऱ्याला...
न्याहाळण्याचा!...,
त्या मेणबतीच्या संधीप्रकाशात!!
पापणी न लवता...
एक मिनिट तू माझ्याकडे पहावीस...
ही माझी ईच्छा... तू मंजूर करून...
त्या मेणबतीलाच उजाळा देत होतीस...!
त्या संधीप्रकाशात...
मला दिसले ते तुझे काजळ डोळे...
मला मागीतली कुणी तरी
कामगारावर कविता हवी मँडम
माझ्या नजरेसमोर आले
ब-याचे प्रकारचे काँलम
काही पान थुंकणारे
काही चुना लावणारे
काही चहा ढोसणारे
काही काटणारे
काही कटणारे
एकच भेटला मला घाण्याचा बैल
त्याच्या वाचुन अडायचे प्रगतीचे वेल
तब्ब्येत होती आलबेल
तरीही कधीच कुरकुर नाही
कामासाठी हपापलेला
सदैव फ़ाईलीत डोके खुपसलेला
कामचोर हसायचे ,कामावर मरशील म्हणायचे
किती काम करतोस आराम कर जरा
तेच हरामखोर मात्र काम घेउन यायचे
येवढे करुन देतोस का
मी जरा जाऊन येतो
तब्ब्येतीचे गाणे तेच सारखे गायचे
ह्याचे नशीबात असे नुसतेच खोकलायचे
असे करता करता दिवस आले जवळ
आले आले आमचे स्वामी बाबा आले
जय महाराष्ट्र!
कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा!
भरारी
घनदाट जाळीमधे
किनखापी पर्णराजी
किरणांची किरमिजी
लगबग झाली
रंगावली ची भूनक्षी
उन सावलीचा मेळ
आकारांचे हे खेळ
प्रसवूनि गेले
नक्षीतूनी दोन पंख
ल्येऊन मी भरारले
अंबराशी धडकले
पडले रडले..
मग उचलले हळु
क्षितिजाचे तू आंगण
आणि विश्वाचे प्रांगण
मज केलेस खुले..
- संध्या
जुनीच. 'आतल्यासहित माणूस' मधे होती
---------------------------------------
फुलांच्या पायघड्यांवरून
त्याचा हात धरुन ती जात असते.
त्याच्या वेगाशी जमवून घेताना ती बेभान होते.
पावले थिरकायला लागतात,
त्याच्या तालाशी जुळायला लागतात.
ती खूश होते त्याच्यावर, स्वत:वर. हसते
स्वत:च्या हसूची ओळख त्याच्या डोळ्यात शोधते.
कधी कधी तीही मिळाल्यासारखी वाटते
ती अजूनच खूश होते, हसते.
कुणी बघत तर नाहीना, ती हळूच बघते
हादरते, ती अदॄश्यच असते.
अचानक आलेलं अदॄश्यपण तिला खूप दुखवून जातं.
अगदी आत आत पर्यंत.
'कश्या पुसल्या गेल्या माझ्या रेषा?'
डोळ्यात प्रश्न घेऊन ती आकाशाकडे पहाते