पृथ्वीचे लग्न ( चित्रांसह)

Submitted by अवल on 22 April, 2011 - 08:09

1_5_0.jpg
जेष्ठातली उतरती सांज
उडू लागली धूळ त्यात
पसरली जणू आसमंतात
लग्नाची ही खबर-बात

2_3_0.jpg
मग केली गर्दी मेघांनी
गेले सारे आभाळ भरुनी
आच्छादन पडे, होई सावली
छे, हा तर मंडप दारी

3_4_0.jpg
वारा सुटला, सुटली पाने
पखरण पिवळ्या पानांची
धरती झाली पिवळी पिवळी
हळद लागली नवरीची

5_0_0.jpg
घुमु लागली वार्‍याची सनई
तडतड ताशा वीज वाजवी
गडगडाट घुमला नभांगणी
छे, ही तर लग्नाची वाजंत्री

6_2_0.jpg
थेंब टपोरे पडू लागले
मोत्यांच्या लडीवर लडी
गावोगाव पोचू लागल्या
तव लग्नाच्या अक्षत-राशी

7_1_0.jpg
मातीच्या ढेपेतूनी वर
येऊ पाहे हिरवे रोप
दोन्ही पाने देती आशिष
पुजते गौरीहर ती त्यास

8_0_0.jpg
उमलूनी, येई पहाट
साकळले धुके दाट
विप्र उभे धरूनी ताठ
दोघांमधला अंतरपाट

9_0_0.jpg
पूर्व दिशेला नभी अवतरे
सप्तरंगी इंद्रधनु ते
जणू सुगंधी सुमनांची
शोभे मुंडावळी कपाळी

10_0.jpg
हिरवी हिरवी हिरवळ त्यावर
रंगबिरंगी नाजूक सुमने
धरती ल्याली नवे रूप
छे, हा तर शालू हिरवा तव

11_0.jpg
गाऊ लागले मधूर स्वरात
सारे खग-गण एक सूरात
एका मागूनी एक गाई
मंगलाष्टके सुरू झाली

12_0.jpg
झर्-झर झर्-झर झरू लागले
डोंगरातुनी खळ्ळाळ झरे
निशीगंधाच्या शुभ्र तुर्‍यांचे
शोभती हार वधू-वरांचे

13_0.jpg
उभे मध्ये मेघांचे तोरण
हळूच बघे वर रवी एक क्षण
झाले सारे केशरी अंगण
संपन्न होई पाणिग्रहण !

गुलमोहर: 

आ हा! Happy

पृथ्वीचे प्रेम ही कविता प्रसिध्दच आहे. हा त्याच्या पुढचा भाग. जरा कविता अजुन वाढवा. नवरी कशी दिसते, कशी लाजते, मंगलाष्टक कोण म्हणतो इ.

सर्वांना धन्यवाद !
चातक एक कडवं अ‍ॅडलयः) जमेल तसं वाढवेन...
नितीनचंद्र, हे जरा जास्तीच हं Blush
दक्षिणा, भेटेन, भेटेन ( संदीपच्या - चेपेन, चेपेन... च्याधर्तीवर) Proud

मस्त आहे!
थोडी थोडी फुलराणीसारखी!
विस्ताराने खुलेल असे मलाही वाटते.
रामकुमार

व्वा!:)

मस्तच Happy

अगदी बाहेरील निसर्गाच्या ऋतुबदलाप्रमाणेच कवितेत बदल घडवुन आणलेस! >>>>आर्येला मोदक Happy

Pages