(चाल :थकले रे नन्दलाला.........चित्रपट -जगाच्या पाठीवर.)
नाच नाचूनी मी खूप दमले...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला.....................ध्रू.
भल्या पहाटे ..कासीम आला...सिन्ध मधला..दाहीर खाल्ला
गझनी मधुनी महमुद येउनी...हिन्दु सम्पत्ती गेला घेऊनी....
भल्या पहाटे ही शोकांतीका,पार लुटले मजला...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला.......................1.
घौरी साला,महंमद आला...प्रुथ्वीराज तू सांभा भोळा...
सोडून दिधले सत्रावेळा....चिरून टाकला तुझा गळा...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला.....................2.
कुतुबुद्धिन तु,ईतुतमिश तू..बलबन तुचि..खिलजी ही तू...
तुघलक तुचि..तैमूर ही तू..सैयद लोधी आला ....
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला....................3.
सकाळ झाली बाबर आला, हुमायुनहुनी अकबर झाला..
जहांगिरीतुन शहाजहांचा..औरंगजेब निपजला....
मार झोडतो मजला..लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला.....4.
दुपार होता ब्रिटीश आला, खाली वाकुनी हात घातला...
डच फ्रेंचला...पोर्तुगिज आला..आणि झोडले मजला...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला....................5.
निलाजरेपणी राजकारणी, सांजवातेला उरी ऐरणी..
दाबुन छाती...वरून टपली..आवाज कानाकखाली...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला....................6.
रात्री वेळि ..कातरवेळी..बनीया खातो ..पुरणपोळी....
हासत हासत मज खिशावर....हात खुशाल हा घाली...
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला....................7.
अथपावेतो जगुन होतो...टिकुन होतो,तरून होतो...
ब्राम्हण आला, भटजी आला....दिसभर कांडतो मजला.....
लुटले रे नन्दलाला...हो...लुटले रे नन्दलाला....................8.
द पोएम आफ मिल्लेनियम - सहस्र वर्षांची कविता.
Submitted by Prakash Gupta on 21 April, 2011 - 13:41
गुलमोहर:
शेअर करा
कधी लिहीलीये ?
कधी लिहीलीये ?