Submitted by yashwant197 on 22 April, 2011 - 09:09
तेजोमय झाला आज पश्चिमेचा घाट
पाऊले ही चालती रायगडाची वाट
गेली सरून आज ती काळोखाची रात
या सूर्याने पावली त्या काळो़खावर मात
राज्याभिषेक आज त्या जाणत्या राजाचा
रुद्राच्या अवतार त्या शिवरायाचा
होऊन सशस्त्र,सिंहासनी बैसले शिवराज
सरले ते दिवस गुलामीचे,आता आपलाच राज
घुमतो मावळ मुलखात्,रांगडा शाहिरी फटका
गगनाला ललकारी उंच भगवा पताका
तीनशे शतकांचे आज बदलले द्रुष्य
आज घडले आहे हे अजिंक्य शिवधनुष्य....
गुलमोहर:
शेअर करा
कविता छान आहे. अशाच नविन
कविता छान आहे. अशाच नविन कविता येउ देत.