Submitted by पुरंदरे शशांक on 22 April, 2011 - 05:51
अंगण
छान सुबकसे जर्जर अंगण
मऊ मुलायम कुठे न खडवण
ओलावा अलवार राखते
धूळ न उसळे कधीही तेथून
छुमछुमले पैंजण कधी येथे
कंकण हिरवे चमकत होते
चिउ-काउच्या गोष्टी ऐकून
पिले उडाली सोडून घरटे
गर्द सावली उन्हे तळपली
ऋतुमानाची चाके फिरली
वादळवर्षा सुसाटवारे
सुरकुत थोडी दिसू लागली
दिसू लागता सांजसावल्या
अंगण अंतरी कातर कातर
तुळशीवृंदावन सामोरी
मंद मंद ज्योतीची थरथर
एकाकी त्या कातरवेळी
उरे साथीला सखी आगळी
एकमात्रचि ती रांगोळी
कणाकणांची केवळ जाळी
गुलमोहर:
शेअर करा
.
.
छान आहे कविता.. एकाकी त्या
छान आहे कविता..
एकाकी त्या कातरवेळी
उरे साथीला सखी आगळी
एकमात्रचि ती रांगोळी
कणाकणांची केवळ जाळी....अगदी यथार्थ.
खूप भावली कविता! भिडणारे आणि
खूप भावली कविता!
भिडणारे आणि प्रभावी शब्द आहेत !!
पहिल्याच ओळीतल्या जर्जर या शब्दाने, विषयाची कल्पना येते, आणि उत्तरोत्तर विषयाची पकड छान जमली आहे.
चिउकाऊच्या गोष्टी ऐकून,
पिले उडाली सोडुन घरटे... (गोष्टीतले चिउकाऊ आणि उडून जाणारी पिले- हा विरोधाभास प्रभावी आहे, आवडला)
जियो !
मनापासून धन्यवाद डॉ. साहेब,
मनापासून धन्यवाद डॉ. साहेब, चैतन्या....
वेगळा विषय .... चांगला
वेगळा विषय .... चांगला हाताळलाय.
छान कविता.....मोठयाने शांतपणे
छान कविता.....मोठयाने शांतपणे वाचल्यावर तर अजूनच आवडली......
सुंदर! वेगळं आणि खास रूपक!
सुंदर! वेगळं आणि खास रूपक!
काका, निशदे,
काका, निशदे, क्रांती,
सर्वांचे मनापासून आभार.....
सुंदर!
सुंदर!
खुप छान.<<.एकाकी त्या
खुप छान.<<.एकाकी त्या कातरवेळी
उरे साथीला सखी आगळी
एकमात्रचि ती रांगोळी
कणाकणांची केवळ जाळी >> ओळी आवडल्या.
अतिशय सुंदर !
अतिशय सुंदर !
याच विषयावर दोन सुंदर कविता वाचल्या १) वरील कविता -कवी - शशांक पुरंदरे
२) डोळा वाटुली सरेना - इंदिरा संत
शशांकजी धन्यवाद सुंदर कवितेसाठी !