सृजनाचा सोहळा

Submitted by अवल on 21 April, 2011 - 11:30

वसंताने इतके रडविले, मला की
बरसूनी गेले, पावसाळे किती ....

फुलली फुले, इतुकी रंगीत सारी
की रंग माझ्यातले सारे, गेले विरुनी ....

फळांनी किती लवली फांदी, फांदी
की रसाळता सारी, आटुनी गेली ....

पालवी फुटे इतुकी , कोवळी कोवळी
की सृजनता सारी, शोषुनी गेली ....

गुलमोहर: 

पहिल्या २ ओळी हिंदीत सुचल्या...
"बहारों ने इतना रुलाया है मुझ को
कई बरसातें बरस गई , यारों...."
अन मग माझ्या हिंदीने जवाब दिला Sad
मग काय पाडली मराठीतच Proud

धन्स सानी अन श्यामली Happy
आधी एक धून मनात हुरहुरत होती, मग त्यातून हिंदी शब्दच फुटले.... मग आमचे हिंदीचे अज्ञान पाझरले... Proud
"बहारों ने इतना रुलाया है मुझ को
कई बरसातें बरस गई , यारों....

गुल खिले है इतने रंगीन सारे
के रंग जिंदगीका उजडा हुआ है

लदी हुई है टहनी, फलोंसे
पर नीरस हुई है जवान सॉसें

पेडों पर निकले है पत्ते बहार के
बस उजड गया है आशियाना यारों "

हिंदी तल्या चुका माफ कराल अशी आशा आहे Happy

व्वा.. हिन्दीतली मस्तच आहे गं!
पण
<<वसंताने इतके रडविले, मला की
बरसूनी गेले, पावसाळे किती ....<< हे ही आवडले. Happy

आरती, हिंदी कविता जास्त आवडली Happy तुला अशा हिंदी कविता स्फुरल्या तर इथे टाकण्यासाठी त्या मराठीत भाषांतरीत कर, पण मुळ हिंदी कविताही प्रतिक्रियेत किंवा वरतीच टाक.

धन्स अश्विनी Happy
अगं पण माझं हिंदी अजिबात बरं नाहीये गं Happy
अन हो तुझी आयडिया छान आहे. मी काय सोडते की काय तुम्हाला माझ्या कविता वाचनातून Wink बरी आयडिया दिलीस Happy

हिंदी कविता जास्त आवडली...
ती धून कुठली होती? उत्सुकता आहे.
शक्य असल्यास कुठे ऐकायला मिळेल का?
(कदाचित ते हिंदीचं मराठीकरण केल्यामुळे,
मराठीत तो 'इंपॅक्ट' येत नसावा. चू. भू. दे. घे.)

शुभेच्छा!

कदाचित ते हिंदीचं मराठीकरण केल्यामुळे,
मराठीत तो 'इंपॅक्ट' येत नसावा. चू. भू. दे. घे.) >>> चैतन्य, अनुमोदन.

चैतन्य, अरे अशीच.... मनातच तयार झालेली धून..... Happy
अश्विनी, चैतन्य अगदी खरं, मलाही तोच फिल आहे. कित्तीदा मराठी खुप हार्ष वाटतं नाही ? हिंदीत किती नाजूक, हलके शब्द आहेत...
अश्विनी Happy

दोन्ही कविता छान...
हिंदी कवितेत "रंगीत सारे" च्या ऐवजी 'रंगीन सारे' किंवा 'रंगभरे' कर.

हिंदी खूप छान आहे!!

कित्तीदा मराठी खुप हार्ष वाटतं नाही ? >>> माझ्या शेजारी उ.प्र. राह्तात. त्यांच्याकडे पाहुणे आले होते आणि काही संवाद चालु होता. मधेच त्या पाहुण्यांचं बोलणं कानावर आलं "मराठी बहुतही कर्कश भाषा है!" Happy

बाई बाई, माझ्या वरच्या "म्हणजे माझे हिंदी बरे असावे नाही " या पोस्टीला चूक ठरवलत की श्यामली Happy
कारण "मबरुक आणि शुकरान" चे नक्की अर्थ काय बरं ? Uhoh