कविता

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?

Submitted by पाषाणभेद on 29 April, 2011 - 20:47

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?

तुम्ही गोळी बघितलीय गोळी?
साधी सुधी खाऊची, लिमलेटची गोळी नाही हो!
किंवा औषधाची कडू गोळीही नाही.
बंदूकीची गोळी? बॅरल मधून सुटलेली?

ती कधी असते तांब्याची, अ‍ॅल्यूमिनीअम किंवा मिश्र धातूची.
झाडल्यावर वेगात जाते अन वेध घेते एखाद्या मस्तकाची.
किंवा आरपार शरीतात घुसते
किंवा कधीकधी शरीरातच मुरते
अन मग चालू होतात रक्ताचे पाट
लाल लाल रक्ताचे पाट.

ती घुसवली जाते सामान्यांच्या शरीतात,
किंवा सहज मजा म्हणून शिकारी प्राण्यांच्या शरीरात.

गुलमोहर: 

तिच्या आठवणी

Submitted by आमोल पाटिल on 29 April, 2011 - 08:31

एकदा तिने मला माझ्या कवीता वाचावयास मागीतल्या,
मी तिला म्हणालो,
"एका कागदच्या तुकड्यात रुप पहाण्या पेक्षा,
एकदाच आरशात पहाण सोप नाही का?" !!!

तर ती म्हणाली,
"आरशा मध्ये दिसेल ही रुप कदाचीत,
पण ते पहयला तुझे डोळे कोठुन आनु"........

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझी शप्पथ.. पहिला प्रयत्न

Submitted by गोजिरी on 29 April, 2011 - 03:52

माझा श्रावण,
माझं आंगण,
माझ्याच भाळी,
चंद्रकोरीचं गोंदण
पाहिलंस ना किती सारं आहे माझ्याकडे..

मुठीतून रेत निसटावी तसं,
माझं अस्तित्व,
माझी सकाळ,
माझं हसू आणि
बेजार व्यथा,
आहेत ना माझ्याकडे..

वाट पाहून हुरहूरणारी
माझी सांज,
चांदण्यांची रात्र,
स्वप्नांचा खच आणि
पहाट दवात हळूवार
निपचीत पहूडलेली आसवं
आहेत ना माझ्याकडे...

तुझी शप्पथ !

-गोजिरी देशमुख

गुलमोहर: 

या खेळावर!

Submitted by नीधप on 28 April, 2011 - 23:24

एक जुनाच शब्दखेळ
---------------------------
अर्थहीन सुरावटींना पाय फुटले,
रूणझुणत भिंगोरल्या त्या
याच्या कानावर,
त्याच्या बोटांमधे

आडवळणाची लय त्यांची
घुमघुमत उगवत गेली
तुझ्या गाभ्यावर
माझ्या मनावर

मनावर लयीचे लाखो धुमारे
सरसरत पेटत राह्यले
ह्या देहावर
त्या वळणावर

देहाची वळणे पाकळी पाकळी
रिमझिम कोरत गेली
इथल्या हवेवर
या घटीकेवर

जिथे तिथे बहरलेल्या सुरावटी
मंद मंद झुळकत बसल्या
या खेळावर
या अर्थावर

- नी

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खरच मला गुंतवु नका ना

Submitted by कल्पी on 28 April, 2011 - 13:02

आता कुणाला देणे
घेणे या शरीराला
आता कशाला
आरशात बघने
या चेह-याला

सारे आता घेउन जाना
स्पदणातली नाती सारी
पूरुन घेतो ,बघु नका ना
आठवणीना सोडुन देतो
हा एकाकी म्हणू नका ना

ही रुपेरी केसकुंतले
माझी नाही ,हसु नका ना
अधु नजर ही झाली केव्हा
नाही कळले
आता तुम्हीही सांगु नका ना

सूर्य उद्याच्या येण्याआधी
माझे मी पण घेउन जा ना
हा माझा ,मी याचा आहे कुणी
आता काहीही बोलु नका ना

गुलमोहर: 

आई

Submitted by aksharkinara on 28 April, 2011 - 04:58

आई

कुनीच नाही माझे ..आई
करूनेचे तळहात पोरके ..आई

आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई

असे जवळ? तसे दुर? भाबडे अंतराळ माझे ..आई

कुनीच नाही माझे ..आई
करूनेचे तळहात पोरके ..आई

असेल, आहे, असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई

कुनीच नाही माझे ..आई
करूनेचे तळहात पोरके ..आई

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सामान्य...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 27 April, 2011 - 11:47

लावुन काळा चष्मा, करतो माझ्यापुरता ताप कमी,
उतरवुनी अन् विमा, उद्याची मनात मी मानतो हमी ।

सामान्यच मी, असेच आहे जगणे माझे नित्याचे
मला कसे हो जमेल करणे, 'प्रयोग माझे सत्याचे'?

चालविते मज गरजच माझी, नसे प्रेरणा वा स्फूर्ती
(मला सोसणे नको, नको अन् सोसण्यातली सत्कीर्ती ! )

पाय पाहुनी निवडुन घेतो अंथरूण माझ्यापुरते
बायकोस मी गजरा घेतो, सुख नाही मज यापरते ।

बिचकत जातो मी रस्त्याने, जिवात नसतो जीव कधी,
कधी स्वतःवर हसतो, रडतो, आणिक करतो कीव कधी ।

तरी उद्याची थोडी आशा माझ्या हृदयी मिणमिणते
आणि देवळामधली घंटा माझ्या कानी किणकिणते ।

सामान्याला, जगण्या-मरण्यामधले अंतर- आयुष्य...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

साद

Submitted by उमेश वैद्य on 27 April, 2011 - 09:22

साद.......
मना संधीचे आज सुटतील वारे
तक्षणि सोड हे खीन्नतेचे किनारे
जरी वाळले काष्ट तुझी डोलकाठी
नवोन्मेषतेचे फुट्ती धुमारे

किती काळचा तू असा 'ऐल' वासी
गड्या रे असा का अससी उदासी?
नसे थांग तुजला जरी पैलतीर्
पुढे चालता स्पष्ट होईल सारे

उठी शोध घे चंदनी मंजुषा त्या
वाळू मधे खोल पुरल्यास का त्या?
उकरुनी काढी, उघडी तया रे
अंतरी मयूर, फुलती पिसारे

तुला ठाव भूमी स्वाधीनतेची
तरी काय ओढी अशी अल्पतेची?
हाकारीसी ना जरी तारु बा रे
प्रासाद तेथील मिटतील दारे

रवि शुक्र ध्रुवा परी मार्गदर्शी
स्तंभावरी दीप क्षितीजास स्पर्शी
घे रोख त्यांचा करती इशारे
विरतील दाही दिशांचे पसारे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझी कविता-८: आपण यांना पहिलत कां ?

Submitted by डॉ अशोक on 27 April, 2011 - 07:39

आपण यांना पहिलत कां ?

त्या दिवशी कुरुक्षेत्रावर
अर्जूनाला गीता सांगून
अठरा दिवसांच युद्ध संपवून
हे गेले, ते अद्याप गायब आहेत!

नंतर पुष्कळा ना हे दिसले म्हणतात -
कुणाला इश्वर म्हणून
कुणाला प्रेषित म्हणून
कुणाला अवतार म्हणून
खरं खोटं कुणास ठावूक !

ह्याना ओळखण्याची खूण-
जाऊ द्या, सांगून काही उपयोग नाही
कारण, इथेच सगळी गोची आहे
अनेका ना अनेक रुपात दिसून सुद्धा
याना शोधनं आज सुद्धा चालूच आहे!

सापडून देणारास वा माहिती देणारास -
बक्षिस इनाम काहीच नाही
आधीच सांगतो, ऐकून नंतर घेणार नाही
सापडल्यास आमच्या कड़े आणू नका
म्हणूनच पत्ता आमचा दिला नाही !

गुलमोहर: 

अधून मधून मी गावी जाऊन यायचो ...!!

Submitted by प्रकाश१११ on 27 April, 2011 - 05:51

अधून मधून मी गावाकडे जाऊन यायचो
फार दूर नाही गाव
तरी लांब वाटायचे
छोटेशे घर कौलारू
माझी वाट बघत बसायचे
घरात गेले की कसे छान वाटायचे
मन माझे कसे मस्त फुलायचे
गावी गेलो की कसे छान वाटायचे

छोटेसे घर तरी परसदारी अंगण होते
अंगणामध्ये मस्त विहीर
नि चाफ्याचे झाड होते
चाफ्याखाली दगडी डोन
नि बाजूला चौकोनी दगड
त्यावर बसून अंघोळीची मजा
शप्पत अशी कोठे नव्हती
खास ह्याच्या साठी
अधून मधून मी गावी जाऊन यायचो

रात्री झोपलो की खिडकीतून आभाळ दिसायचे
चांदोबा नि चांदण्या मैफल जमवायचे
कसे निळे असते आभाळ
किती दिवसांनी हे सारे बघत बसायचो
झुळझुळ हवा

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता