Submitted by चैतन्य दीक्षित on 22 April, 2011 - 00:03
राहिले दूर, सख्या घर राहिले दूर ।
काळ हा रे लोटला, ठेवून आठवधूर ॥ ध्रु॥
कोणत्या वाटे निघालो? नाकळे आता,
संगती एकांत आणी विरहिणीचे सूर ॥१॥
अस्पष्टसा अन तो उद्याचा चेहरा दिसतो
काळजाला बुडविती रे काळज्यांचे पूर ॥२॥
शोधणे स्वतःस आता कठिणसे वाटे ,
दाटली गर्दीच सारी भोवती रे क्रूर ॥३॥
दोन घटका शांततेला सवडही नाही,
पाठलागाने सुखाच्या, लाभते हुरहूर ॥४॥
- चैतन्य दीक्षित.
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
वा मस्त ! आवदली >>>शोधणे
वा मस्त ! आवदली

>>>शोधणे स्वतःस आता कठिणसे वाटे ,
दाटली गर्दीच सारी भोवती रे क्रूर <<< कित्ती खरे
>>>आठवधूर <<< वा मस्त शब्द
साधी, सोपी, सुंदर
साधी, सोपी, सुंदर
<दोन घटका शांततेला सवडही
<दोन घटका शांततेला सवडही नाही,
पाठलागाने सुखाच्या, लाभते हुरहूर ॥४॥<<
मस्त ओळी!
आरती, मंदार, आर्या-
आरती, मंदार, आर्या- प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद !
<<अस्पष्टसा अन तो उद्याचा
<<अस्पष्टसा अन तो उद्याचा चेहरा दिसतो
काळजाला बुडविती रे काळज्यांचे पूर>>
मस्त.....
<<दोन घटका शांततेला सवडही नाही,
पाठलागाने सुखाच्या, लाभते हुरहूर>>
सुंदर........
"काळजाला बुडविती...... .....
"काळजाला बुडविती......
..... लाभते हुरहूर ॥४॥
हे अधिक आवडलं