कविता

कवीला कधीच विचारू नये...

Submitted by आनंदयात्री on 8 May, 2011 - 10:30

कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?
त्यालाही हे माहित नसतं की कुठली वेदना कधी प्रसवली?
नेमकी कुठली शिवण उसवली?
असा कुठला धागा कातरला गेला आणि
ओळ विणून तयार झाली?

बाकीचे जे बोलून मोकळे करून टाकतात
ते हा शब्दात बांधत बसतो..
जुनी कहाणी जुन्या दुखण्यासारखी
पुन्हा उगाळत बसतो...
तेव्हा वाटतं, की जावं आणि हलवावं त्याला.
अशा वेळी एखादा कोरा कागद त्याच्यापुढे द्यावा
आणि समजून घ्यावं आता इथून पुढे त्याची आणि आपली वाट वेगळी...
पण कवीला कधीच विचारू नये - ही कविता कशी सुचली?

कवितेवरून कवीच्या भूतकाळाची चिकित्सा वगैरे अजिबात करू नये,
कारण तोही तेच करतोय...

गुलमोहर: 

सरहद्द

Submitted by आशुचँप on 8 May, 2011 - 06:34

करड्या निस्तेज राखाडी आकाशात,
पांढुरक्या हिमशिखरांच्या मागून
आत्ता कुठे उगवायला लागलाय चंद्र,
वार्‍याने हलणार्‍या पाईनच्या सावल्या मात्र,
तितक्याच गडद आणि भेसूर ……

नेहमीचा स्निग्ध शीतल चंद्रप्रकाश,
आज ओरबाडून काढतोय अंधाराला
त्याच्या तीक्ष्ण नख्यांनी, हवा तसा.
…. दिसू लागलंय त्याचं शरीर
त्या उरल्या सुरल्या अंधारातूनही

देहाच्या उष्ण मांसल गोळ्यातून
फांद्या फुटावेत तसे फुटलेले हातपाय
आता मुडपून पडलेत वेडेवाकडे
शिशीराची पानगळ नेहमीच त्रासदायक
झडून गेलेल्या पानांच्या आठवणीतलं झाड

भरकटलेल्या मनाला देऊन जरब
डोळे स्थिरावतात पुन्हा समोर
….. जमिनीवरच्या किड्यासारखी रेंगाळत

गुलमोहर: 

पैलतीर

Submitted by manisht on 8 May, 2011 - 05:50

भौतीक सुखासंगे धावलो
भोक्ता मी साधनांचा
पैलतीर दिसे आता
अंतःकाळ जवळी आला

न कुठे बांधिली नाती
न कोणी सखे सोबती
भवती मुंगळे सुखाचे
न कोणी अंती संगती

विषय भजनी लगलो
स्तवलो बोल फुकचे
मुखे हरिनाम घेतले नाही
आता हरिध्यास लागे

पिकले पान वेलीवरचे
देठही न हिरवे आता
उडे अंतराळी आत्मा
उरे फक्त पाचोळा

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नेमाने घडते सारे

Submitted by श्यामली on 8 May, 2011 - 02:16

नेमाने घडते सारे...थांबले कुठे ना काही
तरीही सलते अजुनही आता; नाहीस ग आई

प्राजक्ताचा तसाच दरवळ
वेलींवर फुलतेही जाई...
नाहीस तू ; तरीही..आई

अंगणातली तुळस तुझ्या ग
आता गाते अंगाई
नाहीस तू; म्हणून.. आई

दार काढते दृष्ट आता अन
आशीर्वाद उंबरा देई
नाहीस तू; म्हणून ..आई

गुलमोहर: 

आई

Submitted by sanky on 8 May, 2011 - 01:52

माझ्या आईची माया माझ्यावर अपारं..
धुंडाळ्ते माझ्यासाठी कडा अन कपार..
पाना फुलांना जसा फांदीचा आधार..
टिप डोळ्यातुन माझ्या..
ओलावला तिचा पदर..
घास मोजकेच तरी माय हाताने भरवी.
तिची अंगाई ऐकाया..
निज उशीरानं येई..

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती

Submitted by विदेश on 8 May, 2011 - 00:31

( चाल : इंद्रायणीकाठी - देवाची आळंदी )

नव्या साडीसाठी - दोघांची भ्रमंती
चालली खरेदी.. थांबेना ती |धृ |

सवलतींचा ताजा - लागतो ढीग
नाचती विक्रेते.. मागे पुढे |१| नव्या साडीसाठी -

माझ्यापुढे साठे - खर्चाचा हिशेब
भांडणात वाढ.. पत्नीसंगे |२| नव्या साडीसाठी -

मागची उधारी - राहिली अजून
जॉर्जेट .. शिफॉन .. , सुटका नाही |३| नव्या साडीसाठी -

गुलमोहर: 

! अवेळीचा पाऊस आणि तू !

Submitted by Unique Poet on 7 May, 2011 - 07:37

! अवेळीचा पाऊस आणि तू !

अवेळी येणार्‍या पावसाला पाहून
मला आठवतेस ती , तू

धांदल, गडबड उडवणारी ,
चकीत करणारी तू

मी येतेय रे , आपण भेटूया
असल्या क्षूल्लक शिष्टाचारात न पडणारी तू

रोजच पडतोय असा येणारा पाऊस
आणि कालच भेटल्यासारखी बोलणारी तू

अवेळीच्या पावसाला मी हरखून पाहत राहतो
जसं वर्षभराचं एकदम बोलणारी तू

झाडं,रस्ते,बिल्डींग,बंगले सगळ्यांना चैतन्य देणारा पाऊस
माझ्या मनाचं मळभ हटवणारी तू

अवेळी आला तरी सुखावणारा पाऊस
प्रसन्नतेचा शिडकावा करणारी तू

गुलमोहर: 

Two Friends

Submitted by पाषाणभेद on 6 May, 2011 - 20:32

Two Friends

Little John was thin and boney;
His fat friend had a name Tony ||1||

Once both were gone in the woods;
They had school bags without any food ||2||

Tony feels hungry in the after noon;
John said I'll get the food very soon ||3||

John climbs on a Mango tree as he saw;
a watchman came while plucking up mangoes raw ||4||

John jumped down and ran away fast;
Watchman caught Tony at the last ||5||

- Pashanbhed (Stone breaker)
07/05/2011
4:15AM

गुलमोहर: 

तू अश्या कवितांवर एव्हढी हरखून जात जाऊ नकोस...

Submitted by Girish Kulkarni on 6 May, 2011 - 07:58

************************************
************************************

तू अश्या कवितांवर
एव्हढी हरखून जात जाऊ नकोस..
अजून समजली नाहीयत तुला...
स्वतःच्याच निरागसतेवर भाळणारी अन
कमावलेल्या शाब्दीक मार्दवावर जगणारी आयुष्यें...
मनातल्या त्या अचेतन डोहात खडे मारुन मारुन
शिंतोडे उडवायचा खेळ करत जगणं....
स्वतःच्या फाटक्या अस्तित्वाला बांधायला बर पडतं...
मग त्यात.....
कधी असतो तुझा पाऊस
कधी दुरचा एक अबोध मारवा...
कधी देव्हार्‍याच्या आत-बाहेरच आयुष्य
कधी आसुसलेल्या वासनांची शाब्दीक कसरत
अन अजुनही बरच काही.....
कधी तर भीतीही वाटते तुझी
या निरागसतेच्या नक्षीपल्याड येण्याची...

गुलमोहर: 

! जाग !

Submitted by Unique Poet on 6 May, 2011 - 07:35

Z17df4mp.jpg

जाणीवांच्या पार आता ध्यान माझे लागू दे !
अंतराच्या आतमध्ये आत्मज्योत पेटू दे !

झोपलेले ज्ञानचक्षू जागू दे,अनिवारू दे !
चेतनेला साथ आता सृजनशक्ती देऊ दे !

भान येथले जगाचे हरवू दे ,ते जाऊ दे !
सत्याला शोधण्याचे वेध फक्‍त लागू दे !

वासनांचे किल्मीष मनी जे नष्ट सारे होऊ दे !
षडरिपूंना तारतम्याचे ते कुंपण राहू दे !

विचारांच्या पलीकडे अस्तित्व आहे कोणते ?
अस्तित्वहीनतेचे रूप कैसे ते जाणूनी घेऊ दे !

संन्यस्त आणि गृहस्थ फरक कोणता असे !
युध्द आपापल्या जगांशी दोघांचेही सारखे !

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता