पासवर्ड
आयुष्य...
एक उघडं पुस्तक.
कुणीही येऊन त्यातलं
समोर दिसणारं पान वाचतो
आणि वाचनखूण ठेवून,
विनाकारण आपल्या आदीअंताची
समिक्षा करून जातो.
...
.....
आयुष्याला 'पासवर्ड' देता आला असता तर....
..
आनंदाच्या, प्रेमाच्या, मोहाच्या, रागाच्या...
अनेकविध भावभावनांच्या... अगणित क्षणांच्या
विविध 'फाईल्स' बनवून
त्यांना 'लॉक' करून ठेवलं असतं,
मनाविरुद्ध कुणीही त्या 'बाईटस'ना
'हॅक' करणार नाही याची काळजी घेत,
नकोश्या फाईल्सचे 'पासवर्ड' विसरून,
हवी ती पाने पुन्हा-पुन्हा 'रिफ्रेश' करत
मजेत नेटाने 'सर्फ' करत राहीलो असतो.....
स्वतःच.. स्वतःपुरतं मर्यादित असलेलं हक्काच जग.
...
....