राख
सिगरेटच्या एका घ्रुवावर जळता निखारा
आणि दुसर्या घ्रुवावर घुमसता मी,
भरकटलेल्या विचारांची वावटळ
मेंदूचा कण न कण
गरगरवणारी.... बिन पात्याच्या पंख्यासारखी.
पोळलेला अर्क एका झुरक्यानिशी
शरीराच्या रंध्रारंध्रात...
नंतर गुदमरून वाटा शोधत
धुरांची वलये हवेत विरलेली,
पण निखार्याला कवेत घेऊन बसलेली राख.... ??
मटेरीएलिस्टिक राखेला फार जपतो ना आपण.. ?
कधी एशट्रे,
कधी कलशात,
तर कधी होमकुंडात.....
घराच्या कोणत्याही कोपर्यात
तिचा मागमूस न ठेवता..
मग मात्र दूर कुठेतरी विसर्जित.
पण अशा कैक निखार्यांसोबत
जळून राख झालेल्या स्वप्नांच काय ?
आशेच्या धुरात घुसमटत राहते