तुझी शप्पथ.. पहिला प्रयत्न

Submitted by गोजिरी on 29 April, 2011 - 03:52

माझा श्रावण,
माझं आंगण,
माझ्याच भाळी,
चंद्रकोरीचं गोंदण
पाहिलंस ना किती सारं आहे माझ्याकडे..

मुठीतून रेत निसटावी तसं,
माझं अस्तित्व,
माझी सकाळ,
माझं हसू आणि
बेजार व्यथा,
आहेत ना माझ्याकडे..

वाट पाहून हुरहूरणारी
माझी सांज,
चांदण्यांची रात्र,
स्वप्नांचा खच आणि
पहाट दवात हळूवार
निपचीत पहूडलेली आसवं
आहेत ना माझ्याकडे...

तुझी शप्पथ !

-गोजिरी देशमुख

गुलमोहर: 

धन्यवाद. कविता लिहिणे तितके सोप्पे नाही. आर्त विचारांना शब्दात मांडणं किती कठीण आहे हे हि कविता लिहिताना कळलं.

निपचीत पहूडलेली आसवं
आहेत ना माझ्याकडे... >> फार सुंदर, अचुक शेवट.

पहीलाच प्रयत्न फारच स्तुत्य आहे, पण कवितेत पहीलं दुसर काही नसतं मनातून थेट शब्दात उतरते ती कविता. लिहीत रहा मनापासुन.