Submitted by कल्पी on 28 April, 2011 - 13:02
आता कुणाला देणे
घेणे या शरीराला
आता कशाला
आरशात बघने
या चेह-याला
सारे आता घेउन जाना
स्पदणातली नाती सारी
पूरुन घेतो ,बघु नका ना
आठवणीना सोडुन देतो
हा एकाकी म्हणू नका ना
ही रुपेरी केसकुंतले
माझी नाही ,हसु नका ना
अधु नजर ही झाली केव्हा
नाही कळले
आता तुम्हीही सांगु नका ना
सूर्य उद्याच्या येण्याआधी
माझे मी पण घेउन जा ना
हा माझा ,मी याचा आहे कुणी
आता काहीही बोलु नका ना
याचे शरीर किती खंगले ,खरच कशाने
दशा उगाच उधडु नका ना
जाईल तिथे जाऊ द्या ना
या लहरीना त्या लहरीशी
भेटु द्याना ,
काळीज बडवुन रडु नका ना
खरच मला गुंतवु नका ना
kalpee joshee
28/04/2011
गुलमोहर:
शेअर करा