अधून मधून मी गावाकडे जाऊन यायचो
फार दूर नाही गाव
तरी लांब वाटायचे
छोटेशे घर कौलारू
माझी वाट बघत बसायचे
घरात गेले की कसे छान वाटायचे
मन माझे कसे मस्त फुलायचे
गावी गेलो की कसे छान वाटायचे
छोटेसे घर तरी परसदारी अंगण होते
अंगणामध्ये मस्त विहीर
नि चाफ्याचे झाड होते
चाफ्याखाली दगडी डोन
नि बाजूला चौकोनी दगड
त्यावर बसून अंघोळीची मजा
शप्पत अशी कोठे नव्हती
खास ह्याच्या साठी
अधून मधून मी गावी जाऊन यायचो
रात्री झोपलो की खिडकीतून आभाळ दिसायचे
चांदोबा नि चांदण्या मैफल जमवायचे
कसे निळे असते आभाळ
किती दिवसांनी हे सारे बघत बसायचो
झुळझुळ हवा
मी स्वप्नात हरवून जायचो
सकाळी सकाळी कोंबड्याची बांग
कशी सुख द्यायची
अगदी ह्याच्या साठी म्हणून
अधून मधून मी गावी जायचो
परवाच शेत विकले नि सोबत घर सुद्धा
ढसाढसा रडलो
फक्त मनातल्या मनात
ह्यां शहरात एखादा ब्लॉक घ्यायचे चाललेय
आजकाल गावी जात असतो
फक्त मनातल्या मनात .....!!
मनाला भिडनारि कविता वाटलि !
मनाला भिडनारि कविता वाटलि ! खुप मस्त कविता
सुरुवात प्रसन्न करु
सुरुवात प्रसन्न करु गेली......आणि शेवट......
छान वाटली
निनाव नाही आले अजून इथं ?
निनाव नाही आले अजून इथं ?
छान आहे हा निबंध !!
छान आहे हा निबंध !!
प्रकाश१११, कृपया आपण या
प्रकाश१११,
कृपया आपण या कवितेचे रसग्रहण करावे.,ही नम्र विनंती.
डॉ.कैलास गायकवाड | 27 April,
डॉ.कैलास गायकवाड | 27 April, 2011 - 16:18 नवीन
प्रकाश१११,
कृपया आपण या कवितेचे रसग्रहण करावे.,ही नम्र विनंती.
>>> कविता ?? कुठाय कविता ???
कविता इष्टोप ..कविता इष्टोप ....कविता डब्बा एक्स्प्रेस्स ....:खोखो:
** पालथ्या घड्यावर पाणी
** पालथ्या घड्यावर पाणी टाकण्यात हंशील नाही म्हणून पोस्ट संपादित करत आहे. **
मंदार, परसाकडेला तुम्ही खुप
मंदार,
परसाकडेला तुम्ही खुप enjoy केलेले दिसते.
पण -पुणे की, मुंबईला ?
** पालथ्या घड्यावर पाणी
** पालथ्या घड्यावर पाणी टाकण्यात हंशील नाही म्हणून पोस्ट संपादित करत आहे. **
?
?
मुळा, मुथेत खुप दगड आहेत.
मुळा, मुथेत खुप दगड आहेत. जरुर वापरा
कवितेचा आशय कळला मस्त
कवितेचा आशय कळला मस्त वाटला....... कविता अजुन कशी खुलवता आली असती वगैरे वगैरे सल्ला मी देणार नाही कारण मी त्यातला जाणकार नाही...... पण एक वाचक म्हणुन कविता मस्त वाटली उगाच शब्दांच्या जाळ्यात न अडकवता सहज शब्दातुन विषय मांडला...... पुढील वाटचालीस शुभेच्छा.
.
.
वैभ्या दोनदा वाचून दोनदा
वैभ्या दोनदा वाचून दोनदा भावली का?
या रचनेची टिंगल करण्याचे कारण
या रचनेची टिंगल करण्याचे कारण काही कळले नाही, रचना बरिचशी गद्य आहे, पण भावना तरी प्रामाणिक आहेत की राव!
शुभेच्छा व अभिनंदन!
-'बेफिकीर'!
अहो भावना प्रामाणिक आहेत
अहो भावना प्रामाणिक आहेत म्हणून वाट्टेल ते आणि तसं लिहीत सुटायचं का?
पण म्हणुन परसाकडेला
पण म्हणुन परसाकडेला जाण्याच्या level ला जायचे ?
अशोक, टिंगल चालली आहे, समजत
अशोक, टिंगल चालली आहे, समजत नसेल तर काय करणार? असो. यापुढे अनुल्लेख करणेत येईल असल्या कवितांचा (की पंत म्हणतात त्याप्रमाणे निबंधांचा).
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार. ज्याना कविता बरी वाटली त्यांचे आभार पण ज्याना नाही आवडली गद्य वाटली
त्यांच्या प्रामाणिक मताचा मी जरूर आदर करतो .नि मनापासून त्यांचे आभार. मानतो तशी कविता जुनी लिहिलेली होती.
फेरफार न करता टाकली. आणि मित्रानो मी काही तुमच्याशी वाद घालायला येथे नाही आलेलो .तुमच्या शुभेच्छा पाठीशी हव्यात.
बाकी लोभ ठेवाल ..अपेक्षा करतोय !!
अहो भावना प्रामाणिक आहेत
अहो भावना प्रामाणिक आहेत म्हणून वाट्टेल ते आणि तसं लिहीत सुटायचं का?>>>
तुमच्या मनातील निकषांना एन्फोर्स केले तर इथल्या ९० % कविता प्रकाशितच होणार नाहीत.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/19483
http://www.maayboli.com/node/19432
http://www.maayboli.com/node/19115
http://www.maayboli.com/node/19041
अजुन काही प्रामाणिक भावना पहा !!
प्रकाश , तुझ्या कडे कवितांचा साचा आहे का ...मेणबत्त्यांचा असतो तसा...पाघळवल्या भावना अन ओतल्या साच्यात की तयार कविता .... सगळ्या कविता एक समान ...
तुला सिक्स सिग्मा / ISO 90001 नक्की मिळेल प्रॉडक्श्न मधल्या कन्सिस्टन्सी बद्दल
तुमच्या मनातील निकषांना
तुमच्या मनातील निकषांना एन्फोर्स केले तर इथल्या ९० % कविता प्रकाशितच होणार नाहीत.
>>> परत एकदा " कविता म्हणजे काय ?? "
बोललो असतो, पण वाद होतील,
बोललो असतो, पण वाद होतील, जाऊदेत!
(मला वादाची का फिकीर असा प्रश्न कृपया विचारू नयेत, वैताग येतो म्हणून लिहीत नाही आहे.)
प्रकाश, मनापासून एक अनुभव
प्रकाश, मनापासून एक अनुभव सांगतो.
सुरवातीपासून गद्य लेखनाकडे अधिक ओढा असला तरी मी कॉलेजात असताना ५०+ कविता केल्या होत्या. त्यातल्या एक दोघा कवितांना पहिलं बक्षीस सुद्धा मिळालं होतं.
पण सुदैवाने मायबोली आणि आंतरजालावरील इतर अनेक संकेतस्थळांवर चांगल्या/उत्तम रचना वाचायला मिळाल्याने मला माझ्या रचनांचा (अती)सुमार दर्जा जाणवला आणि स्वतःवर नियंत्रण ठेवत माबोवर त्यातल्या फक्त ३-४ कविता टाकल्या आहेत.
असा फिल्टर प्रत्येकाने लावायला हवा.
मंदार, चष्मा तुमचा होता
मंदार, चष्मा तुमचा होता म्हणून तुम्हाला कविता सुमार वाटल्या तुमच्याच! उद्या एखादा म्हणाला की तुमचे चित्रपट परिक्षण वाचून घाईची लागते तर चालेल का?
त्यावेळेस तसे म्हणणार्याचा स्वतःचा चष्मा असेल, तुमचा नाही.
म्हणूदे की. त्यात काय?? आणि
म्हणूदे की. त्यात काय??
आणि हो ते "परिचय" आहे "परिक्षण" नाही.
मान्य, परिचय आहे. असे दिसत
मान्य, परिचय आहे. असे दिसत आहे की मी एकदम त्याबाबत बोलल्यामुळे आपल्याला राग आला की काय!
पण तसे म्हणणे आणि घणाघाती पण मुद्देसूद टीका करणे यात फरक नाही का?
राग आला असल्यास क्षमस्व!
मला राग नाही आला. असो.
मला राग नाही आला.
असो. माझ्याकडून असल्या कवितांवर चर्चा बंद.
अशोक, टिंगल चालली आहे, समजत
अशोक, टिंगल चालली आहे, समजत नसेल तर काय करणार? असो. यापुढे अनुल्लेख करणेत येईल असल्या कवितांचा >>>>-
खट्याळपणा जरुर करावा. मजा जरुर घ्यावी. पण, प्लीझ ,लेवल सोडू नये-
पंत, तुम्ही या रचनेला निबंध
पंत,
तुम्ही या रचनेला निबंध म्हणालात! माझेही तेच मत आहे.
पण याच रचनेला का म्हणालात?
तिकडे इतर अनेक कविता आहेत. त्याही गद्य आहेत. आडव्या लिहिल्या तर सरळ उतारे होतील. मग त्यांना का नाही म्हणत? याचे कारण असे तर नाही प्रकाश १११ तौलनिकदृष्ट्या निरुपद्रवी आहेत?
Pages