Submitted by विशाल कुलकर्णी on 5 May, 2011 - 01:53
त्याने पंख पसरले!
आसमंतात झेपावताना..
क्षणभरच,
त्याची नजर खाली गेली...
याचसाठी केला होता अट्टाहास?
आपल्याच मातीपासून तुटायची कसली ही हौस?
तिथेच निपजलो, तिथेच रुजलो ...
तिचीच ताकद घेत...
आता तिलाच सोडून निघालो ?
त्याच्या पंखातली सगळी ताकदच सरली...
त्याने पुन्हा जमीनीकडे धाव घेतली,
मागे फिरताना...
अपेक्षाभंगाचं दु:ख वागवणारी,
आईच्या डोळ्यातली खिन्नता दिसली.
काय खरं, काय खोट?
काहीतरी चुकतय खरं..!
ह्म्म्म...
त्याने पुन्हा एकदा पंखातली ताकद आजमावली
आणि पुन्हा एकदा सुर्याशी, त्याची नजर भिडली!
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
आशय आवडला. आई बापांना सोडून
आशय आवडला. आई बापांना सोडून कायमचे परदेशात निघून जाणार्यांना ही 'जरा जास्तच गद्य' कविता प्रतिज्ञा म्हणून वाचायला द्यायला पाहिजे अशी इच्छा मनात निर्माण झाली.
हम्म्म.... खरय ! भिडली
हम्म्म.... खरय ! भिडली मनाला....
खुप जुनी कविता आहे ही
खुप जुनी कविता आहे ही बेफिकीरजी. साधारण कॉलेजच्या दुसर्या वर्षाला असताना केलेली. (१९९२ साली)
अवलला अनुमोदन! भिडली एकदम!
अवलला अनुमोदन! भिडली एकदम!
ओह! पण आशय भारीच आहे
ओह! पण आशय भारीच आहे विशालराव!
धन्स
धन्स
आवडली रे.
आवडली रे.
छानय रे!
छानय रे!
खूप आवडली कविता.....
खूप आवडली कविता.....
धन्यवाद मंडळी !
धन्यवाद मंडळी !
छान आहे..
छान आहे..
छान आहे कविता विशाल..
छान आहे कविता विशाल..
आभार्स !
आभार्स !
आवडली... एव्हडी जुनी कविता
आवडली... एव्हडी जुनी कविता असुनही आजही ती व्यवस्थित लागु पडतीय सद्य परिस्थितिला
आकर्षण आणि ओढ यातलं द्वंद
आकर्षण आणि ओढ यातलं द्वंद चांगलं मांडलंय
छानच.
छानच.
सुर्रेख..
सुर्रेख..
धन्यवाद सगळ्यांचे !
धन्यवाद सगळ्यांचे !
सुरेख.
सुरेख.
छान आहे ! (बादवे, कवितेत
छान आहे !
(बादवे, कवितेत काही चुकल्यासारखं जाणवत नाहीये ! व्याकरण, र्हस्व-दिर्घ ई.ई. व्यवस्थित आहे ! मुख्य म्हणजे तुझं अक्षरही वाचणेबल आलेलं आहे ! :फिदी:)
मस्त्त्त्त!!
मस्त्त्त्त!!
मुख्य म्हणजे तुझं अक्षरही
मुख्य म्हणजे तुझं अक्षरही वाचणेबल आलेलं आहे !>>>
धन्स मित्रहो !
>> काय खरं, काय खोट? काहीतरी
>> काय खरं, काय खोट?
काहीतरी चुकतय खरं..! >>
विशल्या, मस्त
काय खरं, काय खोट? काहीतरी
काय खरं, काय खोट?
काहीतरी चुकतय खरं..! >>> विशालराव एकदम झक्कास कविता...