आई ! का गं तु दिवसभर राबतेस ?
मी वाईट वागले तरीही
जवळ मला घेतेस !
प्रेमाने हात डोक्यावर फिरवून
पापे माझे घेतेस
दिवसभराची भांडणं
आपल्या डोळ्यात भरुन घेतेस !
स्वयंपाक करताना डोळ्यातलं पाणी
गालावरून जेव्हा ओघळतं
हळूच पदराने पुसून सांगतेस मला
कांद्यामुळे नेहेमीच असं होतं !

रात्री झोपतांना मला
गोष्ट तु सांगतेस
हसत खेळत माझ्याशी
मैत्रीणीसारखी वागतेस
मी चिडल्यावर कधी
मस्करी माझी करतेस
रडायला जर लागले
तर समजूत माझी काढतेस
बाबा मला ओरडले
तर पटकन त्यांना सांभाळतेस
अंगणाभोवती छान अशी
रांगोळीसुद्धा काढतेस !

शब्द् पुरत नाहीत एवढी
आहेत तुझी कौतुके
मिठी मारु तुला की
घेऊ तुझे मुके ?

- मृण्मयी (शैलेंद्र - मानसी) साठे
(गेल्या वर्षीच्या "मदर्स डे" ला माझी आई खुप आजारी (हॉस्पीटल मधे) होती. त्यावेळी मला पहिल्यांदाच आई विषयी काही लिहावं असं वाटलं. त्या वेळी मी लिहीलेली कविता आपण खालील लिंक वर पाहू शकता)
http://mrunmayee-mydreamworld.blogspot.com/2011/03/my-mummy.html
सई... तू आणि तुझी आई दोघीही
सई... तू आणि तुझी आई दोघीही नशिबवान आहात
खूपच गोड गं सई कशी आहे आई
खूपच गोड गं सई
कशी आहे आई आता?
आणि तुझं अक्षरही छान आहे खूप
सई, खूप गोड आहे कविता
सई, खूप गोड आहे कविता
सई फार गोड कविता आहे. खूप
सई फार गोड कविता आहे. खूप आवडली..
सई... तू आणि तुझी आई दोघीही
सई... तू आणि तुझी आई दोघीही नशिबवान आहात
विश्ल्या, मी पण ! मी पण आहे नशिबवान !
सई खुप गोड कविता. तुला खुप
सई खुप गोड कविता. तुला खुप शुभेच्छा
आणि बाप्पा कडे प्रार्थना तुझ्या आईला पुन्हा कध्धी आजारीच न पाडो 
टवाळा, तुम्ही दोघेही नशिबवान आहातच, इतकी लाघवी मुलगी तुम्हाला लाभलेय
वा मस्त ग सई. आणि १ - ती
वा मस्त ग सई. आणि १ - ती चित्र पण तु काढली आहेस का कुठुन कापुन चिकटवलीस? खुपच छान.
सई सुंदर कविता.. खरच टवाळा
सई सुंदर कविता.. खरच टवाळा खुप नशिबवान आहेस

मलाही monalip सारखा प्रश्न पडलाय
@ मोनाली-पी / वर्षा_म - ज्या
@ मोनाली-पी / वर्षा_म - ज्या ह्युमन फिगर्स आहेत त्या तिने कापून चिटकवल्या आहेत. बाकी सजावट तिची स्वतःची आहे.
सगळ्याना खूप खूप धन्यवाद ! हि
सगळ्याना खूप खूप धन्यवाद !
हि चित्र मी कापून चिटकवली आहेत.