कविता

भविष्य

Submitted by vaiddya on 12 May, 2011 - 06:24

पानांमधले
हिरवे वर्तमान
जाळून खाक करू पाहाणारे
ग्रीष्माचे दाहक उन्हच
बीजाबीजामधले
भविष्याचे एक नवे स्वप्न
घट्ट करत असते !

गुलमोहर: 

आभाळ

Submitted by vaiddya on 12 May, 2011 - 06:22

रात्रीला सुचतच राहातात
गाणी
आणि झोप उडून जाते
अथांग कृष्ण-निळाईखाली
मग
मी
आळवत बसतो
तुझ्याच लाखो-करोडो
तीव्र-मंद्र तारकांचे
एक अखंड आभाळ !

गुलमोहर: 

क्रिकेट विश्वकप आणू जिंकून !

Submitted by Unique Poet on 12 May, 2011 - 04:44

हा एक प्रयत्न आहे.... मराठी खेळगीत { Marathi Cricket Anthem } लिहीण्याचा,... माझ्या प्रिय मित्र अमित पाटील ने सतत माझ्या मागे लागून मला पटवून दिले की हिंदी , इंग्रजी खेळगीत लिहीली जाऊ शकतात तर मराठी का नाही.........मराठी खेळगीत लिहीण्याची कल्पना त्याची आहे. मी यापुर्वी इतर भाषांमधील खेळगीतांचा , कोणत्याही खेळगीताचा अभ्यास केलेला नाही.... त्यामुळे हे स्वतंत्र खेळगीत आहे ... यावर कुठलाही प्रभाव नाही..... आपल्याला आवडेल अशी आशा करतो............ Happy

गुलमोहर: 

'मोरपिस' हरवलंय.....

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 May, 2011 - 02:18

दहावी, बारावी,
इंजीनिअरींग.........
मग असंख्य इंटरव्ह्युज...
शेकडो नकार पचवल्यानंतर,
पदरात पडलेली अनपेक्षीत नोकरी!
मग सुरू झालं नवं चक्र...
रिपोर्टस् , टार्गेट्स, कोटेशन्स
अधुन मधून फसवी इन्क्रिमेंटस्....
.......
.........
...........
नाहीच आठवत आता मला...
घोंगावणार्‍या वार्‍याबरोबर पुढे जाताना,
मागे बसलेल्या तुझ्या, ओढाळ केसांचा तो मादक गंध...

गुलमोहर: 

माझ्या प्रियकरांना..

Submitted by मी मुक्ता.. on 12 May, 2011 - 01:46

(असं म्हणतात की, The best love stories in your life happen when you dont know anything about love. Well, I still dont think I know anything about love. पण नक्की आठवतय 'नंदा प्रधान' वाचताना जे झालेलं माझ्या मनाचं ते.. आणि त्यानंतर भेटलेल्या, न भेटलेल्या अगणिक लोकांविषयी वाटलं ते.. त्या सर्वांसाठी..)
**************************************************
नातं बनतं म्हणजे काय?
नातं तुटतं म्हणजे तरी काय?
कोणतंही नातं बनत नाही..
तुटत तर त्याहून नाही...
जिग्-सॉ पझलसारखच वाटायला लागतं आयुष्य कधी कधी,
सगळ्या गोष्टी असतात,
त्या फक्त शोधुन जागच्या जागी बसवायच्या..
तसच काहीसं होतं का नात्यांचं?

गुलमोहर: 

तुझ्यासोबतचे क्षण..

Submitted by मी मुक्ता.. on 12 May, 2011 - 01:42

अजून मला आठवतात तुझ्यासोबतचे क्षण..
परत एकदा प्रेमात पडल्यासारखं काहीतरी झालेलं..
मनात म्हटलं हे काय भलतच,
आणि आयुष्याच्या अशा वळणावर...?
बरं.. तू असा जगमित्र,
मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..
अनंत विस्तारलेली क्षितिजं समोर घेवुन तू उभा,
आणि मी परतीच्या वाटा बंद झालेल्या वळणावर..
प्रश्न तुझ्या वार्‍यालाही फिरकत नाहीत,
आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी..

अजून आठवतात ते क्षण.. वेडावलेले..
युगांनंतर जिवंत झाल्यासारखं वाटलेलं..
गुलमोहराच्या झाडाखाली,
अमलताशाला कवेत घेवुन येणारं वारं,
स्पर्शून जात होतं तुझ्या-माझ्यातील पोकळीला..
तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्‍यावर

गुलमोहर: 

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

Submitted by पाषाणभेद on 11 May, 2011 - 20:35

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य

क्षितीजावर ढळला आणि एक सुर्य
माझे काळीज मोडून

खडकावरल्या फेसाळ लाटा
पाय धुवूनी जात होत्या
त्याही मागे सरल्या आता
आली ओहोटी म्हणून

शुभ्र पांढरी मऊ रेती
पायाखाली येत होती
ढिगारा त्या रेतीचा
आताच गेला कोसळून

कोण, कोणाचा,कुठला, मी, तो?
कशास धरूनी चालत होतो?
समोर आता तांबड काळसर
आकाश नुरले सारे व्यापून

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१२/०४/२०११

गुलमोहर: 

स्वगत (वाटा)

Submitted by rutuved on 11 May, 2011 - 10:54

वाटांचे ठाव ठिकाणे कुणी सांगावेत?

माझ्या माझ्या म्हणत,
तुझ्या बरोबर धावलेल्या मला...
आज वाटांचा, नात्यांचा,तुझा-माझा,
असण्याचा नि अनुक्रमे नसण्याचा..... ठाव घेताना उमगले;
चालणं तेवढं आपल्या हातात असतं बघ !

वाटा फुटत जातात,सरत जातात...
काही रस्ते अंताला येतात,
तर काही स्वल्पाविरामाशी घुटमळतात,
नि काही अजस्त्र नागासारखे आयुष्य व्यापून जातात...

'आपण' नक्की कुठे हरवलो, ते अजून तितकंसं उमगलं नाही बघ..
बाकी शोध अजूनही चालूये..

कळावे..

तुझा (?)

गुलमोहर: 

कधी उगाचच..

Submitted by श्यामली on 11 May, 2011 - 08:22

कधी उगाचच असे वाटते व्हावे सुरेल गाणे..
कधी उगाचच कसे वाटते व्हावे उदासवाणे?
कधी उगाचच कशी पडावी जगावेगळी स्वप्ने?
कधी उगाचच बरे वाटते भ्रमात ऐसे जगणे
कधी उगाचच वाटे असे की, जवळ कोणी असावे
कधी उगाचच वाटे असे की दूर स्वत:ला न्यावे;
कधी उगाचच हवी वाटते ग्रीष्मामधली तृष्णा
कधी उगाचच जाळत रहातो चांदण्यातला उष्मा
कधी उगाचच कसे रुणझुणे पायातील पैंजण
आणि उगाचच असे वाटते भेटून गेला साजण..
कधी उगाचच असे वाटते चंद्र लपेटून घ्यावा..
कधी वाटते आकाशातल्या ता-यावर झोका घ्यावा
कधी उगाचच झूठ वाटती कवितेमधल्या ओळी

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता