अतुल गुप्ते कलवा

खंत

Submitted by atulgupte on 18 April, 2012 - 02:35

खंत

दिवस निघून हि गेला तरी
तुझी आठवण काही जात नाही
उद्या परत भेटणार आहेस तरी
हृदयातील घालमेल काही थांबत नाही

तू सतत नजरे समोर असतेस
तेंव्हा ओठांना शब्द सुचत नाही
तू नजरे आड होताच
डोळ्यातील अश्रू काही थांबत नाही

तुझे माझ्या आयुष्यात असणे
बरेच जणांना रुचत नाही
बोचरे काटे असतात म्हणून
कोणी गुलाब फुलवायचे थांबत नाही

आपण एकमेकांसाठी जगाव
हे नियतीला मान्य नाही
विरहाची जाणीव असते तरी
कोणी प्रेम करायचे थांबत नाही
कोणी प्रेम करायचे थांबत नाही

गुलमोहर: 

गीत प्रीतीचे

Submitted by atulgupte on 21 May, 2011 - 00:35

क्षितीजावरती  रंग उधळले
मना मनातून पसरत गेले
सुरावटीवर शब्द लहरले
गीत प्रीतीचे ओठी आले

गोड गुलाबी सांज हि आली
जणू लाजुनी लाल झाली
रंग प्रेमाचे सजवीत आले
गीत प्रीतीचे..........

धुंध क्षणात श्वास गुंतले
शब्द ओठावरी थरथरले
भान प्रणयात हरवून गेले
गीत प्रीतीचे..........

थांब सखे ग रात्र थांबली
सौंदर्याची नशा हि चढली
हात गुंफुनी एकरूप झाले
गीत प्रीतीचे...........

गुलमोहर: 

शब्द .....

Submitted by atulgupte on 19 May, 2011 - 03:12

पापण्या मिटुनी जे पहिले
ते स्वप्न सत्य जाहले
हृदयातील आरश्यात
रूप तुझे मी देखिले

दोन जीवांचा अढळ दुरावा
तू हृदयातून संपवला
सुन्या सुन्या मैफिलीस माझ्या
सूर प्रीतीचा लाभला

काळे भोर केस तुझे हे
ज्यामध्ये मी गुंतलो
सजविण्यास आज त्यांना
मीच फुल जाहलो

अल्लड नील नयन देखणे
पाहताच मी ग भुललो
जगविण्यास आज त्यांना
मीच काजळ जाहलो

रूप मोहक सुंदर लोभस
मनोमनी मी बहरलो
काव्य रूप देण्यास त्याला
मीच शब्द जाहलो

गुलमोहर: 

एका दाट काळोख्या रात्री....

Submitted by atulgupte on 18 May, 2011 - 04:25

एका दाट काळोख्या रात्री
चाललो होतो मी दूर गावी
मनात होती सारखी भीती
नव्हती सुरक्षतेची खात्री

जीवात नव्हता माझा जीव
येत होती स्वताचीच कीव
चेहऱ्यावर होता भीतीचा भाव
तोंडात होते देवाचे नाव

कुत्र्यांचे स्वीकारत आव्हान
स्विकारीत रातकिड्यांचा मान
तोडीत मी अंधाराची शान
शोधीत होतो माझे स्थान

अचानक झाला साशात्कार
भीतीचा बाण गेला आरपार
फोडली किंकाळी मी घाबरून
भूत उभा होता माझी वाट आडवून

ऐकताच किंकाळी, शेतकरी
आला घेऊन कंदील हाती
पाहता कंदिलाच्या प्रकाशात
आले जे माझ्या ध्यानात

माझेच मला येत होते हसू
वाटले नव्हते इतके भित्रे असू

गुलमोहर: 

तुझ्या सवे......

Submitted by atulgupte on 18 May, 2011 - 00:46

वाटते तुझ्या सवे
या चांदण्यात निथळावे
तुझ्या सवे या दवात
आज, तर्ळावे तर्ळावे

वाटते तुझ्या सवे
या वनात धुंध विहारावे
धुंदावूनी मस्तीत आज
तुझ्या सवे हरवावे हरवावे

झेलुनी क्षण हे सुखाचे
जपुनी दिन हे प्रीतीचे
वाटते तुझ्या सवे या
स्वप्नात, लहरावे लहरावे

गंध प्रीतीचा आपल्या
फुला फुलातुनी बहरावा
वाटते तुझ्या सवे ही
कळी प्रीतीची फुलवावी फुलवावी

गुलमोहर: 

सावली.....

Submitted by atulgupte on 17 May, 2011 - 04:37

पुन्हा आज कातरवेळी
तुझी आठवण आली
हृदयानी साद घातली
आसवांत विरून गेली
पुन्हा आज.......

का जीवाचे नाते तुटले
शब्द ओठांवरी रुसले
तुझ्या विन जीवन माझे
प्राण हीन शरीर भासे
पुन्हा आज........

नयनात अश्रू लाटा
पद चाली जुन्याच वाट
एकटेपण माझ्या माथा
तरी ओठी तुझीच गाथा
पुन्हा आज......

बहरलेली प्रीत माझी
कशी अचानक कोमेजली
उदास दुखी जीवनी या
आठवण तुझी, सावली
पुन्हा आज......

गुलमोहर: 

तुझी आठवण....

Submitted by atulgupte on 17 May, 2011 - 02:15

तुझी आठवण येतच राहते
हृदयात सतत सलत राहते
मनाला दुख देतच राहते
विरहाची जाणीव करून देते
तुझी आठवण येतच राहते

तुझा सुगंध दरवळत राहतो
तुझा स्पर्श जाणवत राहतो
तुझे बोलणे गुंजत राहते
तुझी आठवण येतच राहते

तुझ्या पेक्षा तुझी आठवणच बरी
तू जातेस ती कधी येतच नाही
पण, तुझी आठवण येते ती कधी जातच नाही
तुझी आठवण येतच राहते

मी मात्र, वाट पाहतोय
या आठवणी घेऊन
तू, येणार केव्हा ?
आठवण हुलकावण्या देतच राहते
तुझी आठवण येतच राहते
तुझी आठवण येतच राहते

गुलमोहर: 

राहून गेलेली गोष्ट.............

Submitted by atulgupte on 6 May, 2011 - 04:11

हो ग सखे, खरच
आयुष्यात खुप काही राहूनच गेले

तुजे लाड आणि हट्ट
पुर्ण करायचे राहूनच गेले

तुझा हात हातात घेउन
चांदण्यात फिरण्याचे राहूनच गेले

तुजा हसरा आणि लाजरा चेहरा
डोळे भरून पहायाचे राहूनच गेले

रुसलेल्या नयनातून वाहणारे
अश्रू पुसायचे राहूनच गेले

माझ्यासाठी उपाशी राहिलेल्या सखीला
घास भरवायचे राहूनच गेले

काळ्याभोर केसात तुझ्या, गजरा
मोगऱ्याचा माळायचे राहूनच गेले

आपल्या प्रेमाचे प्रतिक, आपले
स्वप्न जन्माला यायचे राहूनच गेले

तुझ्या मिठीत शेवटचा श्वास घ्यायचा आहे
पण, हे सांगायचे राहूनच गेले

अपूर्ण जीवनाच्या उतरणीवर समजले

गुलमोहर: 

भाव मनीचा......

Submitted by atulgupte on 31 March, 2011 - 04:28

नको विचारूस, नकोच सांगूस गुपित राहू दे जरा
नकोच देऊस नाव नात्याला भाव हृदयातील खरा.

दगडास पूजिले, नवसही केले हाती रिकामाच घडा
माणूस म्हणुनी जगा जरा रे माणसातील देवच खरा.

मंदिरे बांधली दौलत वाहिली देवाच्या चरणासी
जीव भुकेल्या जर खाऊ घातले तोची धर्म खरा.

राधा चा अन मीरा चाही एकच तो सावळा
प्रीत असो वा भक्ती हृदयी प्रेम भाव तो खरा.

गुलमोहर: 

चाललो एकला मी

Submitted by atulgupte on 25 March, 2011 - 06:50

गर्दीत माणसांच्या एकलाच राहिलो मी
वाटेवरी प्रीतीच्या एकटाच चाललो मी

डोळ्यातील आसवांचे जाहले लाल रक्त
हृदयात साजनीची उरली याद फक्त

ओठावरील शब्द निशब्द आज होते
कळले कधी ना तुला ते नाव तुजेच होते

होतीस साजणी तू राणी माझ्या हृदयाची
झालीस आठवण तू सोडून साथ साजणाची

न सांगताच गेलीस तोडून सर्व नाती
वेचीत राहिलो मी विखुरलेले मोती

शोधिले नयनांनी परी तू कुठेच नव्हती
छबी साजनीची माझ्या ओंजळीत होती
माझ्या ओंजळीत होती ............

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - अतुल गुप्ते कलवा