सांग ना आई...
Submitted by धनेष नंबियार on 4 May, 2011 - 11:15
आई तुझ्या कथेतील
परी सांग ना कोणाची?
शांत लाजर्या चांदोबाची
कि लखलखणार्या सुर्याची....
आवकाशातुन कोसळणारे
हे आश्रु सांग ना कोणाचे?
रंगबेरंगी धनुष्याचे
कि गडगडणार्या ढगांचे...
झाडांमध्ये लपलेले ते
घरटे सांग ना कोणाचे?
चिऊताईचे मेणाचे
कि कावळ्याचे ते शेणाचे...
आई तुझ्या हातातले
गोड घास सांग ना कोणाचे?
इथे इथे बस रे मोराचे
कि तुझ्या या छकुल्या बाळाचे....
- धने(श)ष
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा