आठवणींची मैफिल .......

Submitted by किंकर on 5 May, 2011 - 18:14

मंद वारा, रातराणीचा पसारा
गंधित करीत गेला हवेचाच घुमारा
रात्र काळोखी,साद अनोखी
आवाजाने त्या मी भानावर,
अंतरीचा आवेग झाला अनावर....

होती तिची हाक कि मजला झाला भास
गोंधळून श्वासानेच सोडला उच्छ्वास
गायला ती बसता असा लागे गंधार
स्वरातील किरणांनी फिटे जगण्यातील अंधार....

मनोमनी आठवत करतो तिचे नमन
काळीज चिरत गेला आठवणींचा यमन
सुरातील तिच्या झंकारता मारवा
आठवणींच्या वळचणीत घुमु लागला पारवा.....

विणेवरी छेडली तिने गतस्मृतींची तार
सप्तसुरांचा इंद्रधनू छेडी मज मनी झंकार
गाण्याच्या तानेतून ती मला बोलवी
मजवाटे स्वरामागे दडलीय भैरवी !!!!

गुलमोहर: 

मस्त !