आमच्या खोलीत तेंव्हा राणी मुखर्जी रहायची
भाडं बीडं देत नसे स्वप्नात एखादी पप्पी द्यायची
भिंतीवर बसुन कधी कंटाळली नाही बिचारी
रोज हसुन बघायची, आमची फाटकी बनियन नि मळक्या विजारी
आमची दाढी, आमची अंघोळ, उघड्या डोळ्यांनी बघायची
आम्हां पोरांत एकटीच पण बिन्धास जगायची
खोडी कुणी काढली तरी राणी कधी चिडली नाही
आमच्या कुठल्याच भांडणात राणी कधी पडली नाही
आमच्या मैत्रिणींना ही राणी हसुन भेटायची
आमचं काही सांगते की काय? उगाच भीती वाटायची
आम्ही पाळलेल्या पाली तिच्या सोबत खेळायच्या
आमच्या सारखंच तिच्याही अंगा-खांद्यावर लोळायच्या
आमच्या जमिनीवर तिने पाय कधी ठेवला नाही
वाटते तुझ्या सवे
या चांदण्यात निथळावे
तुझ्या सवे या दवात
आज, तर्ळावे तर्ळावे
वाटते तुझ्या सवे
या वनात धुंध विहारावे
धुंदावूनी मस्तीत आज
तुझ्या सवे हरवावे हरवावे
झेलुनी क्षण हे सुखाचे
जपुनी दिन हे प्रीतीचे
वाटते तुझ्या सवे या
स्वप्नात, लहरावे लहरावे
गंध प्रीतीचा आपल्या
फुला फुलातुनी बहरावा
वाटते तुझ्या सवे ही
कळी प्रीतीची फुलवावी फुलवावी
पुन्हा आज कातरवेळी
तुझी आठवण आली
हृदयानी साद घातली
आसवांत विरून गेली
पुन्हा आज.......
का जीवाचे नाते तुटले
शब्द ओठांवरी रुसले
तुझ्या विन जीवन माझे
प्राण हीन शरीर भासे
पुन्हा आज........
नयनात अश्रू लाटा
पद चाली जुन्याच वाट
एकटेपण माझ्या माथा
तरी ओठी तुझीच गाथा
पुन्हा आज......
बहरलेली प्रीत माझी
कशी अचानक कोमेजली
उदास दुखी जीवनी या
आठवण तुझी, सावली
पुन्हा आज......
तुझी आठवण येतच राहते
हृदयात सतत सलत राहते
मनाला दुख देतच राहते
विरहाची जाणीव करून देते
तुझी आठवण येतच राहते
तुझा सुगंध दरवळत राहतो
तुझा स्पर्श जाणवत राहतो
तुझे बोलणे गुंजत राहते
तुझी आठवण येतच राहते
तुझ्या पेक्षा तुझी आठवणच बरी
तू जातेस ती कधी येतच नाही
पण, तुझी आठवण येते ती कधी जातच नाही
तुझी आठवण येतच राहते
मी मात्र, वाट पाहतोय
या आठवणी घेऊन
तू, येणार केव्हा ?
आठवण हुलकावण्या देतच राहते
तुझी आठवण येतच राहते
तुझी आठवण येतच राहते
आधी वेदनेचे बीज
अगदी मनाच्या सात कप्प्यांआड
रुजावे लागतं;
फुटणारे धुमारे त्याचे
आवरावे लागतात, सावरावे लागतात !
त्याची पानं
बाहेर पडू देता कामा नये....
वेदनेच्या झाडाचे
असे अश्रूभवन
होता कामा नये !
त्याचे हिरवेपण
जपण्यासाठी
पाने सगळी गिळून
आतल्या आत त्यांचे
काटे करावे लागतात
मधून मधून खुपले तरी
साजरे करावे लागतात....
निवडूंगाचे झाड
हे असेच वाढवावं लागतं!
आलेच कधी फूल
तर तेव्हढे मात्र
हळूच हळूच
बाहेर पडू द्यावं...
एखादी तरी कविता
उमलतेच ना ?
जंगलातला वणवा ,वणव्यात हिरवळ
मनातली हिरवळ सुकवतय कोण
चुलीतले सरपण सरपणाचा जाळ
मनातले काहूर पेटवतय कोण
वरणात डाळ की डाळीत पाणी
पोटातली भुक भागवतय कोण
लक्तर अंगावर ,लक्तरातली लाज
लाजेला बेशरम करतय कोण
कोरडा पाऊस ओरडा "पाऊस"
आसवांना गालाशी खिळवतय कोण
गडगंज पैसा ,पैशाचा पाऊस
ख-या पावसात भिजतय कोण
कल्पी joshee
सखे निजली ही रात
व्यर्थ पुन्हा जोजवून.
तुझी भुललेली साद
मंद निशिगंधी श्वास
माझा पुनवंचा चांद
भेगाळून जाई आज.
तुझे स्वप्नील नयन
जागी मीलनाची आस
माझा पुनवंचा चांद
त्याच्या काळजाला काच.
तुझ्या प्रेमाचा बहर
लावी सागरी भरात
माझा पुनवंचा चांद
अजाणतं बळ यात.
तुझी आभाळाची शेज
त्यास चांदण्यांची रास
माझा पुनवंचा चांद
आज आमुशाचा दास.
तुझ्या ह्रुदयी अपार
प्रीतझरा हा खळाळ
माझा पुनवंचा चांद
त्याच्या नशिबी गिर्हान.
ये पहटवारा कुहुक तरंगे वरती
रविकिरणांसह गंधात नाहती लहरी
नवगेंद फुलांचे शिरिष मिरविती शिखरी
तोषवती तरु गुलमोहर तन मन
शहारून या प्रहरी
अंतरी महाली घुमे पारवाबोली
डोळ्यात बंद पापणीतळी स्वप्ने शकुनांची ओली
एकांत रुपेरी माया अवघी न्यारी
ओठांत उमलती शृतिसुमनांच्या
नवपर्णांकित वेली
विरघळे जहर; ऋतु वसंत सण माहेरी
मोकळ्या दिशा आकाशी पाटी कोरी
मोहात कुणी संन्यस्त फिरे माघारी
ही निसर्ग किमया; मय भाळावर
जीवन ह्याची दोरी
घे जगून जगणे उरल्या श्वासांवरती
गगनात भरारी; घाल गवसणी पुरती
माळून चांदणे भर लाटांवर भरती
सोन्याच्या रेशिम नात्यांना
मिरवू दे काठावरती
पुन्हा पाणी दे.........
पुन्हा पाणी दे, पुन्हा पाणी दे
तगमग या जीवांची विलयाला ने
पुन्हा पाणी दे.........
वाट पाहताना सारे जग झाले जुने
कोरडेच नदीनाले आभाळही सुने
सरीतून अमृताच्या संजीवन दे
पुन्हा पाणी दे.........
स्पर्श तुझा परीसाचा जणू नवलाई
थेंबातून डोकावेल गर्द हिरवाई
सृष्टीला या चैतन्याचा नवा रंग दे
पुन्हा पाणी दे.........
नको लावू वेळ आता तुटेल ही आस
उरामध्ये उरलेला शेवटचा श्वास
रूप मेघाचे धारून कृष्णवर्णी ये
पुन्हा पाणी दे.........
विसरलोच की...
राग........द्वेष
सुख......दु:ख
स्तुती......निंदा
आशा......निराशा
कुठल्या तीरांचा वेध घेतोय मी.. ?
कशाला आदळतोय मी या तीरावर नाहीतर त्या ?
का या सगळ्या गडबडीत,
पोहोणेच विसरलोय मी..... ?