Submitted by पुरंदरे शशांक on 16 May, 2011 - 04:41
विसरलोच की...
राग........द्वेष
सुख......दु:ख
स्तुती......निंदा
आशा......निराशा
कुठल्या तीरांचा वेध घेतोय मी.. ?
कशाला आदळतोय मी या तीरावर नाहीतर त्या ?
का या सगळ्या गडबडीत,
पोहोणेच विसरलोय मी..... ?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शशांक मित्रा सपोर्ट घेऊन
शशांक मित्रा सपोर्ट घेऊन गेलास म्हणून असे झाले एवढं सगळं एकाच वेळेस शोधण्याचा विचार मनात आला. सपोर्ट ट्युब सोडून एकदा पोहून बघ हातपाय हलवून किनारा नक्की शोधशील.
भरकटलेल्या मनाची अवस्था
भरकटलेल्या मनाची अवस्था थोडक्यात चांगली मांडलेय.
आवडली!
आवडली!
भावली! बहुतेक आपण सगळेच असे
भावली!
बहुतेक आपण सगळेच असे विस्कटलो, भरकटलो आहोत.... शोध कशाचा घेत होतो तेही विसरलो आहोत आताशा....