पुन्हा पाणी दे.........

Submitted by धूमकेतू on 16 May, 2011 - 06:37

पुन्हा पाणी दे.........

पुन्हा पाणी दे, पुन्हा पाणी दे
तगमग या जीवांची विलयाला ने
पुन्हा पाणी दे.........

वाट पाहताना सारे जग झाले जुने
कोरडेच नदीनाले आभाळही सुने
सरीतून अमृताच्या संजीवन दे
पुन्हा पाणी दे.........

स्पर्श तुझा परीसाचा जणू नवलाई
थेंबातून डोकावेल गर्द हिरवाई
सृष्टीला या चैतन्याचा नवा रंग दे
पुन्हा पाणी दे.........

नको लावू वेळ आता तुटेल ही आस
उरामध्ये उरलेला शेवटचा श्वास
रूप मेघाचे धारून कृष्णवर्णी ये
पुन्हा पाणी दे.........

गुलमोहर: 

सहीच, धुम्केतू! Happy

नको लावू वेळ आता तुटेल ही आस
उरामध्ये उरलेला शेवटचा श्वास
रूप मेघाचे धारून कृष्णवर्णी ये
पुन्हा पाणी दे.........

हे मस्त!