????

Submitted by कल्पी on 16 May, 2011 - 13:02

जंगलातला वणवा ,वणव्यात हिरवळ
मनातली हिरवळ सुकवतय कोण

चुलीतले सरपण सरपणाचा जाळ
मनातले काहूर पेटवतय कोण

वरणात डाळ की डाळीत पाणी
पोटातली भुक भागवतय कोण

लक्तर अंगावर ,लक्तरातली लाज
लाजेला बेशरम करतय कोण

कोरडा पाऊस ओरडा "पाऊस"
आसवांना गालाशी खिळवतय कोण

गडगंज पैसा ,पैशाचा पाऊस
ख-या पावसात भिजतय कोण
कल्पी joshee

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कोरडा पाऊस ओरडा "पाऊस"
आसवांना गालाशी खिळवतय कोण > कल्पि हे कडवे नाही उमगले....बाकी ब्युटीफुल Happy