त्याचं असं दूर जाणं,
भेटू केव्हातरी असं सांगून,
कुठेतरी नव्या क्षितिजांवर,
ओल्या देहानं मातीसवे
दरवळत राहणं.. चालायचंच !
आज तो परतणार आहे,
हो हो आज तो येणार आहे,
कालची थंडगार आभाळाची सावली,
हेच तर सांगत होती..
हळू हळू ओल्या चाहूलीची गर्दी,
अगदी शिवार ओलांडून पांगत होती..
पण आता तीच्यावाचून तो म्हणजे,
जुन्या जखमांवर ओली शिंपडच,
अन एकेका थेंबासोबत विरघळत जातो,
तो माझ्या हजार स्वप्नांचा खच..

ही पोर ( कविता) रूसली म्हणून खरडलेय काहीतरी ..
कुठूनी उतार नाही
कुठूनी चढाव नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
तोच तोच दिवस रोज
विसाव्याची बात नाही
गंधाळिल्या मोग-याची
पुन्हा तशी रात नाही
साचलेल्या पाण्याला या
कुठूनी प्रवाह नाही
रूसली ही पोर तिच्या
भावनांना वाव नाही
उन्हाने जो गेला पारा
आरशाला भाव नाही
आठवांची सांज होई
आसवांचा ठाव नाही
खुलले ना शेर अता
गझलेला दाद नाही
हरविले शब्द तिचे
तिची तिला याद नाही
याद नाही दाद नाही
कवितेला नांव नाही
जादू पावसाची....
जादू वळिव सरींची .... मातीत अत्तर सांडायची
जादू काळ्या ढगांची.... मनमोर फुलून यायची
जादू थेंबाथेंबांची.... दोन मने जुळायची
जादू लखलख वीजेची... घट्ट मिठीत मिटायची
जादू फास्ट राइडची.... बिलगत भुर्रS जायची
जादू खोडकर वाऱ्याची... रेशीमबटा उडवायची
जादू ओल्या ओठांची... ओठांनीच टिपायची
जादू साथीत भिजायची... पंख नसता उडायची
जादू चिंब क्षणांची.... मनात जपून ठेवायची
************************************************************
राहवणार नव्हतंच त्याला !
कुणी इतका वेळ दूर राहू शकतो का?
जिवाभावाच्या दोस्तांपासून !
तो तर अगदीच माणुसवेडा..
माणसाच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला शोधणं,
खुप... म्हणजे खुपच आवडतं त्याला,
माणूस दु:खात असला की तो अश्रु बनून कोसळतो,
सुखात असला तरीही आनंदाश्रु बनुन येतोच...!
मग येताना येतो घेवुन सोबत..
सुगंध प्रियेच्या पहिल्या स्पर्शाचा !
मोकळा होतो अलगद मग गुदमर...
तिच्या विरहात घालवलेल्या एकाकी रात्रींचा !
तसा तो आजही आला...
मी येणार आहे लवकरच,
हळुवारपणे गालावर टिचकी मारत,
ग्वाही देवून गेला... !
चला...
पहिली माझी कविता हो
प्रेयसीने वाचली -
अर्धी लिहिली होती तरी
अय्या कित्ती छान म्हणाली !
दुसरी माझी कविता हो
आईने ती ' पाहिली ' -
कौतुकाने सांभाळूनी
पेटीतच ती ठेवली !
तिसरी माझी कविता हो
बापाने वाच(व)ली -
कागद मागे पुढे बघुन
कोरी बाजू वर ठेवली !
चौथी माझी कविता हो
दुसऱ्याने ती पाहिली -
खो खो हसून तिसऱ्याकडून
तीनशे मित्रात फिरवली !
पाचवी माझी कविता हो
बायकोने वाचली -
काही समजली नाही तिला
रद्दीतच तिने घातली !
सहावी माझी कविता हो
शेजाऱ्याने वाचली -
नेहमीप्रमाणे 'जळून ' त्याने
तुकडे करून भिरकावली !
सातवी माझी कविता हो
उतरती दुपार,
परक शहर..
रंगबेरंगी पानांची,
स्वच्छंदी पानझड..
अशातच मग...
वाहत्या वा-याबरोबर,
काही पानं तुम्हाला येऊन बिलगतात...
त्या रंगात वाहत जाताना,
अचानक
उराशी बाळगलेली
सारी पानं, नजरेसमोर पसारा घालतात...
नि भरकटत नेतात...
वा-याच्या दिशांच्या पार.......!
उरकुन घेत,
आपण स्वत:शीच हसतो,
एक पान, उचलून वहीत ठेवत...
अव्याहत...
आयुष्याची निसटती पानं
गोंजारत बसतो..
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा?
खाता नही पिता नही
बंद पडलीय त्याची वाचा ||धृ||
अब मै क्या करू उसको?
नही डाक्टर दिखानेको
तेरे आंगनमे वो जाताय
कुकुचकु कुकुचकु वो वरडताय
मेरा दानापानी नही उसको भाता
अरे मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||१||
देख हळुहळु तो कसा भागताय
लई उदास उदास दिखताय
चोच उघडी रखके तो बसतोय
नही फडफड फडफड करताय
अब्बी तुच हैरे बाबा उसका दाता
मेरे मुर्गे को क्या हुवा चाचा? ||२||
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी
किती दिस झालं, आठवंना सालं
गोष्ट सांगतो मी खरीखुरी;
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||धृ||
हि असली कसली चढती महागाई
वाढत्या भावानं जीव निघून जाई
पहिल्या आठवड्यात पगार संपतो
बँक खाते अन खिसा रिकामा होतो
पैसा जावून मी जणू होतो भिकारी
लई दिसांची मी खाल्ली नाही शिरापुरी ||१||
ह्या भाववाढीनं डोकं वर काढलं
महागाईनं आगीत तेल टाकलं
पेट्रोल सत्तर रूपये लिटर झालं
गरीबीत दिवस काढणं आलं
काळोख्या रात्री चंद्रकोरीची धरावी आस...
निर्जन रस्त्यावर हलकेच व्हावा तुझ्या सावलीचा भास.
तुला पाहायला जपलेले श्वास...
वेलीवरल्या सायलीचा दरवळता सुवास.
ते उंचावलं आकाश, डोकावता प्रकाश...
चिमुकल्या पंखांनी स्पर्शावं नभास..
असाच सुरु होतो अन् संपतोही आयुष्यचा प्रवास
मात्र कायमच सोबत करतो माझी
तुझ्या असण्यावरला विश्वास...
आरती स्वामीनाथा
दत्तगुरूच्या अवतारा
अक्कलकोटच्या राजा
आरती स्वामी राजा
जगाच्या तू कल्याणा
स्वामी माझा प्रगतला
दीनाच्या तू दीनानाथा
आरती स्वामीनाथा
तिन्ही जगाच्या तू नाथा
भक्ताच्या तू नाथा
अमृताच्या तू डोहा
आरती स्वामीनाथा
अज्ञानाच्या अंधारा तू
दूर करीशी नाथा
देउनी वरप्रसादा
आरती स्वामीनाथा
गाणगापुरी वास तुझा
गिरीनारी वास तुझा
त्रीभुवनी संचारता
आरती स्वमीनाथा