कविता

गातेस घरी तू जेव्हां

Submitted by विदेश on 16 May, 2011 - 01:24

( चाल: नसतेस घरी तू जेव्हां -)

गातेस घरी तू जेव्हां
जीव सुटका-सुटका म्हणतो
शांतीचे विणता धागे
संसार नेटका होतो !

छत भंगुन वीट पडावी
हल्लाच तसा ओढवतो
ही पाठ कणाहिन होते
अन् चेहरा बारका होतो !

ये घरमालक दाराशी
हळु गाण्या , तो खडसावे
खिडकीच्या उघडुन दारा
तो बोंबा मारून जातो !

वळ पाठी उमटवणाऱ्या

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तर....

Submitted by UlhasBhide on 15 May, 2011 - 14:19

तर....

का, कसं ..… कुणास ठाऊक ?
आज आठवणींचं पाखरू
वळचणीतून मोकळ्यावर आलं….
आठवली….
ती नजरानजर,
चोरट्या कटाक्षातले ते भाव….
आठवल्या,
कधी सहज घडलेल्या भेटी
तर कधी, जुळवून आणलेले
भेटींचे योगायोग…..
कधी चुकून झालेला ओझरता स्पर्श….
अजुनही अंगावर शहारा आणणारा…..
"आपकी नजरोंने समझा प्यारके काबिल मुझे...."
..... संमेलनात तू गात असताना
मला मित्रानं मारलेली कोपरखळी,
तुझ्या नजरेने मिश्किलपणे हळूच टिपलेली….
सारं जाणून देखील,
तसेच राहिलो गं ….
अव्यक्त ....
मनातलं गूज
नाही आलं ओठावर
कंठातच शब्द थिजले, अवघडले
हृदयातच रुतून राहिले…..
………….

गुलमोहर: 

पाश

Submitted by चातक on 15 May, 2011 - 12:28

***
सोडुनी आलो दुरवर येथे
नाही मुल्य भावनांस जेथे

काळानेच साधिला डाव हा सारा
सुटला सर्व तो नात्यांचा पसारा
मंद गती ती स्मृतिभ्रंशाची
कारण त्यांस इथली संस्कृती
दोष न दिसे तिचा ही तसा
जोपासली मी तिजं मनातुन येथे..
नाही मुल्य भावनांस जेथे
सोडुनी आलो, दुरवर येथे

वाटे मजला अता यावे परतुनी
कळेना कसा हा भाव आटला
संवेदनांना आतला मार्ग दाखविला
पैशांसाठी पैश्यानेच देश सोडविला
'स्नेह भाव' असे दर्शन न मिळे
जगती माणसे अर्थालाच येथे...
नाही मुल्य भावनांस जेथे
सोडुनी आलो, दुरवर येथे

मोडुनी करार झुगारुन ही बंधने
पुन्हा चारही ॠतुंना बिलगेन मी
मुक्त होउनी या 'मोह पाशा'तुन

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझे भास होते

Submitted by क्रांति on 15 May, 2011 - 05:54

कधी चांदण्याला तुझी आस होती
कधी श्रावणाला तुझे ध्यास होते
मला मात्र जन्मांतरी सोबतीला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते

निजेच्या क्षणी जोजवाया मनाला
तुझे शब्द होते, तुझे सूर होते
पहाटे जशी जाग आली, उशाला
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते

गळा हुंदका दाटता सावराया
तुझा स्पर्श होता, तुझे हास्य होते
जरा एकटे वाटता साथ द्याया
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते

फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना
हसू वाटणारा तुझा गंध होता
झर्‍याला खळाळून लोभावणारे
तुझे स्वप्न होते, तुझे भास होते

समेला जशी दाद उस्फूर्त यावी
तसा या जिवाला तुझा छंद होता
दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी,

गुलमोहर: 

तुझ्याविना..

Submitted by के अंजली on 15 May, 2011 - 05:26

कालचाच चंद्र आहे कालच्याच वेली
कालचेच चांदणे रात्रीच्या पखाली

कालचा उसासतो फुलांमधून वारा
कालच्या बरसती ढगांमधून धारा

कालच्या सुरावटीत कालचेच राग
कालच्या भरातल्या कणा कणास जाग

कालचीच मीही आहे कालचेच सारे
तुझ्याविना सख्या पुन्हा बहरेन का रे??

गुलमोहर: 

सूर्य आणि बाप ...

Submitted by -शाम on 15 May, 2011 - 03:29

सूर्य आणि बाप ...

माझे आणि सूर्याचेही डोळे उघडण्याआधी
बाप गेलेला असायचा डोंगराच्या पलीकडे
भाकरीचा सूर्य शोधण्यासाठी ...

अंगणात सूर्याची किरणं यायची
पण त्या आधीच बापानं सोडलेलं असायचं अंगण
अन धरलेला असायचा रस्ता..
अशा वाड्यांचा,
जिथे आजही उघड्या अंगाने
स्वागत करतात माणसं,
उगवणा-या प्रत्येक सूर्याचं..

बापापुढे हार खाल्लेले हिवाळे, पावसाळे
माणसांचे प्रवास रखडवतात
हे खरं वाटत नसायचं तेंव्हा,
जेंव्हा कोणत्या ही ऋतूत सुर्याआधी
सुरु व्हायचा बापाचा प्रवास
आणि संपायचा तो ही सूर्यानंतरच...

चार चौघांमध्ये,
चारचौघांसारखं जगण्याची, आणि
आम्हालाही जगवण्याची धडपड

गुलमोहर: 

तुझ्या माझ्या ...

Submitted by vaiddya on 15 May, 2011 - 01:04

तुझ्या माझ्या डोक्यावर
आपापलं हे
वेगळं होत गेलेलं
आकाश ..
अजूनही चमकतात त्यावर
आठवणींच्या प्रकाशाचे तारे !

तुझ्या माझ्या
विलग विलग
क्षितिजांवर
अजूनही उगवतात
जुनेच चंद्र !

तुझ्या माझ्या
वेगवेगळ्या दुनियांचे
अजूनही स्पर्श एकमेकांना
जेव्हा वाहातात
जुन्या संदर्भांचे वारे !

गुलमोहर: 

नव कवयित्री

Submitted by सखीप्रीया on 14 May, 2011 - 00:48

कवयित्री.....
शब्दाला शब्द....
यमकांचा अलंकार....
...की झाली कविता असे नाही,
जाणीव आहे मलाही.
मी नव्हे कुणी श्रेष्ठ कवयित्री
...पण मनातून कोसळणार्‍या शब्दधारांचे काय?
शेवटी त्यांनाही कागदजमीन हवीच हवी.
मग त्याला उच्च प्रतीची कविता म्हणोत,
किंवा नुसतेच कागद काळे म्हणोत.
माझी सृजनशीलता, काव्यप्रतिभा वाहू देते,
या चुकत्-माकत केलेल्या काव्य प्रयत्नाने.
तेव्ह्ढीच मन्-मोकळीकता, शांतता !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

त्या दिशांना

Submitted by कैश on 13 May, 2011 - 12:14

खरा आरंभ हा कुठून असतो?त्याला अमूक एक जागा,वेळ कधी नसावी असं मला वाटतं.मा.बो.वर वर्षभर आहे.कविता एवढे दिवस करतोय.आज हा...काय म्हणू 'आरंभ'...आता करतो आहे.
------------------------------------------------------------------------------------

न रस्ता सोयीचा आहे, न ही वाट रोजची रे...
बदलेले वारे दिशातुनी ज्या,त्या दिशांना भिंत नाही रे||

धुक्याचे भरजरी आंगण,सडा दारी फुलांचा जरी
कुठे गेलेत सुर्यकिरण,तिडा आहेच अजून करी

ढळला ध्रुव अता जुनासा,परी राहिली दिशा तिच
फेडले उतरले नभ-तरी…सावळ्या मेघांत म्लानशी वीज

चालता हे दूर-दूर, डोळ्यात अनोळखी पूर
येतोच बाजूने सूर, पण वाजती रिते नुपूर

गुलमोहर: 

ही शेवटचीच कविता असेल......

Submitted by सांजसंध्या on 13 May, 2011 - 12:10

ही शेवटचीच कविता असेल..

पावसात वाहून गेलेले
कांही शब्द मी शोधून आणीन
गच्च ओलेत्या कागदांना
उष्ण उच्छवासाची ऊब देईन
अंगात भिनलेला पाऊस
डोळ्यांतून बरसत असेल
तेव्हां कदाचित.....
ही शेवटचीच कविता असेल..

आठवांना चुचकारत
लेखणी हातात घेईन ..आणि
चुकार आसवांचे थवे
डोळ्यांत दाखल होतील
माझ्या डोळ्यांदेखत जी
पुसटशी होत जाईल
कदाचित.....
ही शेवटचीच कविता असेल

धुक्याच्या किनखापी पडद्याआडून
किन-या बोच-या हास्याच्या, लकेरी येतील
माझी क्रौंचकाहीली.. वाढत जाईल
एव्हांना जांभळ्या छटांचे नर्तन सुरू होईल
कृष्णसावल्या जमा होत असतील
तेव्हांच.. लेखणीही थिजलेलीशी होईल

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - कविता