संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा ‘इर्शाद’ नावाचा काव्यसादरीकरणाचा कार्यक्रम दिवाळी पहाटेला आयोजित करण्यावरून वादंग झालेला वाचला. परभाषांमधून आलेले अनेक शब्द तत्सम आणि तद्भव रूपात अनेको वर्षे मराठीत रुळले आहेत, त्यातलाच हाही. त्यावर आक्षेप असायचं कारण मला नीटसं कळलेलं नाही.
हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या देशात संस्कृतीचे इतके प्रवाह मिसळलेले आणि लुप्त झालेले असतात, त्यातून एखादा कसा वेगळा काढायचा आणि का?
इथून मागे कदाचित प्रत्येक दहा दहा वर्षांच्या टप्प्यावर उभे राहून बघितले तर शेतीतल्या अनेक कामांचे स्वरूप पूर्णपणे बदलून गेलेले आढळेल. शेतीतल्या अनेक आधुनिक स्वयंचलीत अवजारांनी आधीच्या अवजारांची जागा घेतल्याने, नवनव्या लागवडीच्या पद्धती आल्याने, त्या त्या कामांचे स्वरूप ओघातच बदलून जाते. या नवीन कार्यपद्धतींत नवीन संज्ञा जन्म घेतात आणि त्या यथावकाश रूळतात. यात काही पारंपारीक संज्ञा मागे पडतात. शेतीतल्या अशा नव्या-जुन्या संज्ञांचे संकलन करण्यासाठी हा धागा.
माहिती विचारण्यासाठी / शेअर करण्यासाठी / पडताळून पाहण्यासाठी.
चक्रपुजा- नवरात्रातील एक विधी
होणार होणार म्हणत म्हणत १९वर्षांपासून पेंडिंग असणारी नवरात्रातील चक्रपुजा आमच्या माहेरी २०१४ मध्ये संपन्न झाली आणी सगळे भरुन पावलो. आमच्या माहेरी चक्रपुजेची परम्परा आहे.
कुलदेवता: बिजासनी देवी(सेन्धवा) मुळ स्थानः विन्ध्यवासिनी देवी (मिर्झापुर, उ.प्र.)
शशक - निचरा
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो.>>>
कोण ते? नवीन सूनबाई वाटतं .. सुंदर गोड चेहरा आहे..
कुकरशिवाय भात, पाट्यावर चटणी वाटणं, इडली, डोसे, इडिअप्पम्, सांभारे.. सगळं साग्रसंगीत लागतंय इथे.. विजार - लुंगीचा तंगड्या पसरून आराम /योग..
कामाचा ताण .. सततची बंधनं, वैचारिक मागासलेपण यांनी हिची घुसमट..
त्यातच सारखंच तुंबणारं ते खरकटं पाणी ; अस्वस्थतेचं शेवाळे मात्र हिच्या मनावर साचतंय..
गेले खूप दिवस मी मायबोलीवर भरपूर माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारे लेख वाचत आहे. घरापासून दूर माझ्या घराची आणि संस्कृतीची आठवण करून देणारी ही मायबोलीवरची माणसे अगदी कुटुंबसारखी वाटू लागली आहेत. इतके दिवस विचार करत आहे की मे पण काहीतरी लिहावे, ही इच्छा मनात आहे. पण कुठल्या विषयावर लिहावे हा प्रश्नच होता. मला माझ्या कामासाठी खूप लिहावे लागते.. पण ते सगळे इंग्रजीमध्ये आणि ते देखील वैद्न्यानिक भाषेत. त्यामुळे विषय निवडने तसे अवघडच होते! काल माझ्या मैत्रीणिंबरोबर गप्पा मारताना आमच्या लक्षात आले की आमच्यासारख्या मुलींच्या गोष्टी सांगणारी पुस्तके, लेख, सिनेमे तसे कमीच आहेत.
श्रावण मासी हर्ष मानसी..’ वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो ‘पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला ‘ड’ गट म्हणू शकतो.
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजसां तेज उत्तमम् ।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव ॥
“अशा भाकरी तुज्या कुनी केल्या व्हत्या गं ये भवाने.. हयेचं शिकीवलं व्हय तुज्या आयनं तुला?”
रुक्मिन बाई नेहमी प्रमाणे सुनेवर खेकसत होती.
पण सून तिच्या वरची..
“ये म्हातारे, माज्या आयवर जाऊ नको.. दिसाच्या इस-पंचइस भाकर्या थापायच्या म्हंजी काय गम्मत वाटली काय तुला? त्या करून अजून तिकडं आंगणवाडीत खिचडी शिजवायला जायाच असतया मला, जर्रा येळ झाला की ती बाय वरडती. त्यात आता येळच्या येळी फोनवरून सगळं वर कळवाव लागतं. तुमास्नी काय कळणार हाय त्यातलं! पातळ-पातळ थापत बसले तर घरलाच बसावं लागल मला कायमच. जे बनतय ते खावा गुमान नायतर थापा भाकर्या तुमी!”
यावर्षी सारेगमप लिटल चॅम्प्स् मराठी पुन्हा येत आहे.
याची जाहिरात गेले काही आठवड्यांपासून येत आहे त्यामुळे उत्सुकता ताणली होती/आहे. पण नुकतेच कळले की यावेळी परिक्षक नसून ज्युरी असणार आणि ते ज्युरी म्हणजे आधीच्या लिल-चँपमधले अंतिम पाच स्पर्धक आहेत. एकही एलिमिनेशन नसणार. ही वरची नवीन माहिती मिळाल्यावर थोडी धाकधूक वाटली की या फॉरमॅटमुळे कार्यक्रम रंगेल का?
कार्यक्रमाची चर्चा करण्यासाठी हा धागा.
इरॉटिका आणि पॉर्न यांच्यात फरक काय असा प्रश्न केला तर त्याचे उत्तर फार कठीण आहे असे नाही. पॉर्न (अश्लील) साहित्य, गाणी, प्रतिमा किंवा चित्रपट म्हणजे स्त्री आणि पुरूष यांच्या शारीरिक जवळीकीचा संपूर्ण देखावा. स्त्री आणि पुरुषाच्या समागमाचे मादी आणि नरात झालेल्या संभोगाचे हीन रूपांतर, ज्यात आपल्या जोडीदाराबद्दल वाटणारी आपुलकी, प्रेम, भावना किंवा अगदी खोलवर वाटणारी काळजी याचा संपूर्ण अभाव असून केवळ प्राणीजन्य मैथुनाचा तो एक भाग होऊन जातो. यात भाग घेणारे सर्व स्त्री पुरूष एका विवक्षित क्षणी अपमानित केले जातात, खास करून स्त्री पात्राला तर अगदी नेहमी तसे केले जाते.