भाग ४ - चंद्रापीड

Submitted by माझेमन on 4 May, 2025 - 08:16

प्रतापदित्याच्या मृत्यूनंतर चंद्रापीड सत्तेवर आला.

चंद्रापीडच्याच काळात मोहम्मद बिन कासीमने सिंधवर स्वारी केली.

सिंध पडले. दाहीरचा मृत्यू झाला. लाडी राणीने जोहर केला. राणी बाईशी बिन कासिमने जबरदस्तीने निकाह केला. सूर्या व परिमला कुमारीला खलिफाला भेट म्हणून पाठ्वण्यात आले. दाहीर पुत्र जयसिंह मात्र जीव वाचवून काश्मीरच्या आश्रयाला आला.

बिन कासिमने जयसिंहाला आपल्याकडे सोपवण्याचा व आपले मांडलिकत्व पत्करण्याचा निरोप काश्मीरला पाठवला. चंद्रापीडाने तो अर्थातच धुडकावून लावला व काश्मीरकडे मोर्चा वळवलेल्या बिन कासिमशी जालंधरजवळ युद्ध करून चंद्रापीडाने त्याचा पराभव केला.

खिलाफतीकडून तातडीचा निरोप आल्याने बिन कासिम परतला व तिथेच मृत्यू पावला. काही कथांप्रमाणे सूर्या व परिमला कुमारीने
खलिफाचे कान भरवून त्याच्यावर सूड उगवला.

चंद्रापीडाचा राज्यकाल मात्र अनपेक्षितपणे संपुष्टात आला. त्याच्या सत्तालोलुप बंधूने, तारापीडाने चंद्रापीडाची हत्या करवली व तो सत्तेवर विराजमान झाला.

तारापीड बंधू म्हणून कसाही असो, राजा म्हणून काश्मीरला बलवान करण्याचेच त्याचे धोरण होते..

तारापीडाचा मृत्यू अनैसर्गिक होता. चंद्रापीडाच्या हत्येमुळे नाराज असलेल्या दरबाऱ्यांनी त्याची हत्या केली अशीही वदंता आहे.
तारापीडाचा मृत्यूनंतर सत्तेवर आला सर्वात लहान भाऊ मुक्तापीड.

राज्यारोहणाच्या वेळी मुक्तापीडाने उपाधी धारण केली ललितादित्य.

Chandrapeed Bin Kasim fight.pngऋणनिर्देश :
1. कर्कोटक राजांची वंशावळ व ललितादित्याचा दिग्विजय इ. माहिती राजतरंगिणीच्या श्रीमती अरुणा ढेरे व श्री प्रशांत तळणीकर यांनी केलेल्या मराठी अनुवादातून घेतली आहे.
2. अत्यंत महत्वपूर्ण अशी या राजांचे कालखंड, वेगवेगळ्या मोहिमांची विस्तृत माहिती श्री. संजय सोनवणी यांच्या ‘काश्मीरचा सम्राट ललितादित्य’ या पुस्तकातून घेतलेली आहे.
३. सहा सोनेरी पाने - स्वातंत्र्यवीर सावरकर

भाग १ - एक उपेक्षित सम्राट
भाग २ – नागभूमी
भाग ३ - कर्कोटक वंश
भाग ४ – चंद्रापीड
भाग ५ - सम्राट ललितादित्य मुक्तापीड
भाग ६ - उत्तर विजय व राज्य
भाग ७ – दिग्विजय

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काश्मीरच्या इतिहासाची चांगली माहिती.
सातहि लेख वाचले.
नेहेमी भारताचा इतिहास वाचल्यावर काही वेळाने मनात एकदम विषाद निर्माण होतो की एव्हढे मोठे हिंदू लोकांचे साम्राज्य - काश्मीरच काय, अफगाणीस्तान ते तिबेट, काश्मीर ते श्रीलंका, नि इतर पूर्वेकडील देश, इंडोनेशिया, मलेशिया, गुजरात ते ब्रह्मदेश इतक्या सगळ्या देशांवर पूर्वी भारतीयांचे वर्चस्व असताना हळू हळू करत केव्हढा तरी मोठा भूभाग इतर लोकांनी बळकावला नि आता उरला आहे केव्हढा लहान भारत!!

१९४७ -४८ मधे काश्मीर भारतात सामील झाला असून पाश्चिमात्य देश अजूनहि काश्मीरला India occupied KashmIr म्हणतात. हलकट ब्रिटिशांना १०० टक्के माहित होते नि समजत होते तरी ते नालायक लोक युनो मध्ये पाकीस्तानच्या बाजूने बोलत होते!

वाईट वाटते ही परिस्थिती पाहून.

हा लेखही छान.

नेहेमी भारताचा इतिहास वाचल्यावर काही वेळाने मनात एकदम विषाद निर्माण होतो >>> +१