मैत्र जिवांचे

Submitted by शिवानी बलकुंदी on 5 June, 2025 - 06:27

पसायदान हे ज्ञानेश्वर माऊलींनी विश्व नियंत्याला केलेली फक्त प्रार्थनाच नाही आहे तर त्यामधून त्यांनी विश्व कल्याणासाठी मागणे देखील मागितलेले आहे, हे आपण सगळेच जण जाणतो. पण आज इथे मला त्यामधील या फक्त दोनच शब्दांनी साद घातली आणि मग मला त्यांचा अर्थ नव्याने उमगला, जो मला इथे सगळ्यांना सांगावासा वाटतोय.
वरील दोनच शब्द आणि ते शब्द असलेली ओळ म्हणजे,
“भुता परस्परे जडो, मैत्र जीवांचे.”
खरंच किती व्यापक अर्थ सांगणारी ही ओळ आहे ना. मैत्र या शब्दातून व्यक्त होणारा भाव आपल्याही नकळत आपल्याला एक ऊर्जा, समाधान, आनंद, प्रेम, आदर, अशा विविध रंगी भावना देऊन जातो. मग ती मैत्री कुणाही सोबत असली तरीही, ती फक्त एक निर्मळ, निकोप मैत्रीच मात्र असायला हवी. म्हणजे मग त्या मध्ये मैत्रीचा अस्सल रंग टिकून राहतो.
मैत्री ची व्याख्या खरे तर खूप व्यापक आहे, तरीही आपण मैत्री हा शब्द फक्त ऐकला, वाचला किंवा उच्चारला तरीही आपल्या डोळ्यासमोर मात्र लगेच आपले जवळचे, खास मित्र, मैत्रिणी हेच येतात ज्यांच्याबद्दल आपल्या मनाच्या कोपऱ्यात एक खास जागा असते. आणि त्यांच्या सोबत आपला आनंद तर नेहमीच आपण साजरा करीत असतो, पण आपले दुख: सुद्धा आपण आपल्या त्या मित्रांसोबत असताना च व्यक्त करतो.
पण अशी मैत्री आपण काही ठराविक च लोकांसोबत करीत असंतो. त्यामुळे आपल्या मैत्रीवर आपणच बंधनं घालून ठेवलेले आहेत की काय असे वाटते.
थोडा व्यापक विचार केल्यावर आणि आपण आपला परीघ आधिक मोठा केल्यास आपण अनेक जणांशी एकाच वेळी सारख्याच आपुलकीच्या भावनेने मैत्री करू शकतो, असे वाटल्या वाचून राहत नाही.
माणसांची अशी मैत्री कुणा कुणाशी होऊ शकते यावर जर अधिक खोलात जाऊन विचार केला तर त्यामधून अनेक विविधांगी नाती आपल्या नजरेसमोर येतात.
त्यामुळे माणसांचे मैत्र हे प्राणी, पशू पक्षी, निसर्ग, ग्रंथ, आपले छंद, आपले काम यांच्या सोबत देखील असू शकते.
तसेच हे मैत्र समवयस्कांसोबत तर असतेच पण एकाच घरात सोबत राहाणाऱे, भावंड, पतिपत्नी, आई मुले, वडील मुले, सासू सून, सासूसासरे आणि जावई, यांच्या मधे देखील असते किंवा असू शकते.
खास अशा मैत्री शिवाय आपल्याला इतर ही विशिष्ट व्यक्ति, प्राणी, पशू पक्षी, निसर्ग यांच्या बद्दल देखील आपुलकीची भावना असते. आणि आपण नेहमी त्यांची काळजी घेत असंतो, त्यांना नेहमीच मदत देखील करीत असंतो,
पण त्यांना नेहमी आपण त्या त्या नात्या च्या भावनेतून बघत असंतो. मात्र इथे प्रत्येक नातं हे त्याचं वेगळेपण जपून देखील एकमेकांसोबत मैत्री पूर्ण व्यवहार करू शकते.
नात्यांमधे जर काही कारणाने किंवा प्रसंगाने कटुता, दुरावा आला तरीही त्या नात्यांमधली मैत्री ते नाते तुटू देत नाही तर ते संबंध अधिक दृढ, मोलाचे आणि कायमस्वरूपी होतात.
आपले सोबती, जवळच्या नात्यामधील व्यक्ति हे कायम आपल्या सोबत असतातच असे नाही, मात्र मैत्रीची भावना ही कायम स्वरूपी असते. म्हणूनच जो जो ज्यावेळी आपल्या जवळ आहे, सोबत आहे त्याच्याशीच आपण मैत्री केली तर, आपण कधीही एकटे होऊ शकणार नाही म्हणूनच तर ज्ञानेश्वर माऊलींना पण म्हणावेसे वाटले आहे,
भुता परस्परे जडो, मैत्र जीवांचे.”

#सुरपाखरू

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

>>>>आपण आपला परीघ आधिक मोठा केल्यास आपण अनेक जणांशी एकाच वेळी सारख्याच आपुलकीच्या भावनेने मैत्री करू शकतो,
नोप!! Happy

>>>>नात्यांमधे जर काही कारणाने किंवा प्रसंगाने कटुता, दुरावा आला तरीही त्या नात्यांमधली मैत्री ते नाते तुटू देत नाही तर ते संबंध अधिक दृढ, मोलाचे आणि कायमस्वरूपी होतात.
नॉट ऑलवेज Sad कधीकधी एखादा चमकणारा तेजस्वी तारा, आपल्या आयुष्यातून, नख लागल्याने, निखळुन पडतो.

>>>>>>>त्यामुळे माणसांचे मैत्र हे प्राणी, पशू पक्षी, निसर्ग, ग्रंथ, आपले छंद, आपले काम यांच्या सोबत देखील असू शकते.
आमचं एक 'मिस्टर स्मिथ' नावाचे कबूतर होते न्यू जर्सीत. आई ग्ग इतका लॉयल होता तो. वेळ मिळेल (म्हणजे प्रणयाराधनेतून वेळ मिळाला की Happy ) गॅलरीत येउन आमच्या कडे बघत बसे. आमचा मित्रच होता तो. जीव लावतात हे प्राणी.
---------------------------
मैत्र व्हायला आदर, प्रेम, जिव्हाळा आणि एकमेकींना द्यायला वेळ व उर्जा लागते. सहवासाने प्रेम निर्माण होते हे खरे आहे. पूर्वीच्या, माझ्या रुममेटस माझ्या मैत्रिणी आहेत. आणि माझ्या मनात नेहमी त्यांच्याकरता शुभचिंतनच होते. त्यामुळे एकमेकींना द्यायला वेळ हवा यावर मी दृढ आहे. ऑनलाइन ही आपण काही लोकांकडे आकर्षित होतो, काही दुर्लक्षित रहातात काही कोड्यात पाडतात. तेव्हा हे जे मैत्ररुपी सुप्त आकर्षण आहे ते स्थलातित असते असे मत आहे.
----------------------------
पूर्वी नवर्‍याने सॅरकॅस्टिकली आणि रागाने विचारलेले आठवते "किती मैत्रिणी आहेत तुला? म्हणजे ज्यांना तू मैत्रिण वाटतेस अश्या" ......... आय कॅनॉट फर्गेट ईट. पण त्यातून मी शिकले, मैत्रीत देवाण घेवाण लागते तशीच तडजोडही. एकदा माझ्या मूड डिसॉर्डरवरती ऑषध लागू पडल्यानंतर खूप मैत्र मिळाले. तोपर्यंत आय कॅरिड चिप ऑन माय शोल्डर.

>>>>>>आज इथे मला त्यामधील या फक्त दोनच शब्दांनी साद घातली आणि मग मला त्यांचा अर्थ नव्याने उमगला,
वाह!! मस्त
लेखातील भावना आवडली.
---------------
असे म्हणतात, कॉन्शस मन (मूर्त) असते आणि एक सबकॉन्शस ( सुप्त/अमूर्त). पैकी जेव्हा कोणी टॉर्च घेउन आपल्या अमूर्त मनात प्रकाश टाकते, आपले स्वभान विस्तॄत करते ते गुरुचे कार्य असते. क्वचित एखाद्या मैत्रामुळे असे होउ शकते. अगदी कॅथर्सिस सुद्धा. मन ढवळून विष किंवा अमृतही निघू शकते.
.
असो मैत्राचे, क्वचित उत्कट अनुभव आहेत. पण जाऊ देत. जिथे उत्कटता नाही ते नाते मला उथळ वाटाते, वेळ गुंतवावासा वाटत नाही. त्यामुळे सर्वांशी मैत्री नाही होउ शकत. इट्स स्प्रेडिंग युअरसेल्फ टु थिन.

@ सामो विस्तृत प्रतिक्रियेसाठी अनेक धन्यवाद. कदाचित प्रत्येकाची मैत्रीची वेगळी व्याख्या आणि वेगळे अनुभव देखील असू शकतात.
लेखाचा सारांश असं आहे की तुमच्या गरजेच्या वेळी तुमच्या जवळ उपलब्ध असलेल्या कोणत्याही व्यक्ति, वस्तु, छंद याकडे तुम्ही मैत्री च्या भावनेने बघितले तर कदाचित तुमची ती कठीण वेळ निघून जायला मदत होऊ शकते, असो.
खरे तर माझ्या ही आयुष्यातून एक अनमोल तारा असाच काही कारणाशिवाय निघून गेलेला आहे. त्यामुळे तुमचे ही मत मान्य आहे.
मन ढवळल्याने विष किंवा अमृत ही निघू शकते, योग्य विश्लेषण, व्यक्ति तितक्या प्रकृती. कदाचित अमृत निघेल हा आशावाद असेल आणि विष निघेल हे वास्तव ही असू शकते.

@नि.३ धन्यवाद

>>>>>>>खरे तर माझ्या ही आयुष्यातून एक अनमोल तारा असाच काही कारणाशिवाय निघून गेलेला आहे.
अरेरे!! तुमचे दु:ख मला कळू शकणार नाही पण एक जरुर सांगेन, लुक फॉरवर्ड.
.
जीवन में एक सितारा था
माना वह बेहद प्यारा था
वह डूब गया तो डूब गया
अंबर के आंगन को देखो
कितने इसके तारे टूटे
कितने इसके प्यारे छूटे
जो छूट गए फ़िर कहाँ मिले
पर बोलो टूटे तारों पर
कब अंबर शोक मनाता है?
जो बीत गई सो बात गई!
- (हरिवंशराय बच्चन)

>>>>>>>>>योग्य विश्लेषण, व्यक्ति तितक्या प्रकृती. कदाचित अमृत निघेल हा आशावाद असेल आणि विष निघेल हे वास्तव ही असू शकते.
समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.